पुणे महापालिकेच्या ७७० कोटीचं गौडबंगाल की बांधकाम महाघोटाळा, टॅक्स व विधी विभागाने देखील बांधकाम विभागावर फोडले खापर
पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/कोरोना महामारीचे कारण देऊन चालु आर्थिक वर्षात पुणे महापालिकेला टॅक्स,बांधकाम व जीएसटीची सह इतर खात्यांकडून महासुल मिळाला नाही. त्यामुळे विकास कामे करण्यास अडचणी येत असून, आम्ही लवकरच नवीन नोकर भरती करून, बांधकाम व टॅक्स विभागाकडून जास्तीत जास्त कामे करून घेवून, पुणे महापालिकेला जास्तीत जास्त महसूल मिळविण्याचा संकल्प अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सोडला आहे. परंतु ज्या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम विभागाची मंजुरी घेतली नाही, मंजुरी घेवून, दुसर्याच प्रकारचे बांधकाम जागेवर केले आहे, अशांची संख्या मोठी आहे. तसेच विनामंजुरी व विनाभोगवटा ज्यांनी जागेचा वापर सुरू केला आहे, त्यांच्याकडून टॅक्स वसुल करण्यात मिळकत कर विभाग कमी पडला आहे. मागील एक महिन्यांपासून पुणे महापालिकेच्या महसुलाबाबत आम्ही चर्चा घडविल्यानंतर, टॅक्स विभागाने बहुचर्चित कसबा ३१+३३ वर नोटीसा बजाव...









