धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात लोकशाहीचा महाउत्सव, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. तर काही भावी इच्छुक उमेदवार कोणती आघाडी कशी होते याची वाट पाहत वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत वावरत आहेत. परंतु पुणे महापालिकेच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त श्रीमती सुरखा भणगे यांनी सार्वत्रिक निवडणूकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. भावी नगरसेवकांच्या सुविधेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. संपूर्ण धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रांगणात भव्य-दिव्य मंडपाची उभारणी केली असून, जसे काय एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या वा राजकीय नेत्याच्या मुला-मुलीच्या विवाहाची तयारी आहे की काय असा भास होत आहे. सर्वत्र एखाद्या विवाहासारखी लगबग सुरू आहे. खऱ्या...









