
पुणे मनपा कडुन मंजुरी दिलेल्या शुक्रवार पेठ टिळक रोडवरील बांधकामाखाली दडलयं काय…
अ) बांधकाम व्यावसायिकाकडुन महापालिका नियमाविरूद्ध अपराधिक कृत्य - १) प्रारूप विकास आराखडा व मान्य विकास आराखडा माहे २०१७ नुसार रस्ता रूंदी क्षेत्र हेच दर्शनी सामासिक अंतरात समाविष्ठ केले आहे. दर्शनी सामासिक अंतर शून्य आहे. २) सदर मिळकतीमध्ये मान्य करण्यात आलेले दुकाने, शॉप्स, त्याच वादग्रस्त दर्शनी सामासिक अंतरात बांधकामे करून दुकानांना ऍक्सेस देणेत आला आहे. ३) इमारतीच्या मान्य नकाशा व्यतिरिक्त दर्शविणेत आलेल्या पॅसेजचे क्षेत्र सदनिकेमध्ये समाविष्ठ करून पुणे महापालिकेचा एफ.एस.आय. मर्यादेचे उल्लंघन केले आहे. मान्य नकाशा वरील प्रत्येक मजल्यावर अंतर्गत पॅसेजचे क्षेत्राचा ऑफिसेस व सदनिकेमध्ये समावेश केला आहे. ४) फ्रंट मार्जिनमध्ये पायर्या, (स्टेअर केस) रॅम्प घेण्यात आला आहे. ५) पुणे पेठ शुक्रवार घरांक क्र. १०४१ वरील इमारतीचा विना भोगवटा वापर सुरू आहे.
एकुण २१ तक्रारी नंतर ७/११/२०१९ रो...