Tuesday, January 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

काल शिवसेना फुटली… आज राष्ट्रवादीत गट पडले, थोडक्यात… सत्ताधारी प्रबळ पक्ष लहान पक्षांना खिळखिळे करतात, फुट पाडतात हेच खरे

काल शिवसेना फुटली… आज राष्ट्रवादीत गट पडले, थोडक्यात… सत्ताधारी प्रबळ पक्ष लहान पक्षांना खिळखिळे करतात, फुट पाडतात हेच खरे

राजकीय
नॅशनल फोरम/अनिरूद्ध शालन चव्हाण…..काल पर्यंत कै. बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील गटातटांवर नेहमी भाष्य करीत असत. काय हे गट… काय हे तट… म्हणून खिल्ली उडवली जात होती. देशातवर स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने तर नेहमीच रिपब्लिकन पक्षाच्या गटाविषयी गरळ ओकली आहे. परंतु आता बाळासाहेबांची शिवसेना फुटली. त्यात ठाकरे गट, शिंदे गट तयार झाले. पुढे निवडणूकांनतर किती गट पडतील हे सांगताही येणार नाही. आता काल परवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, राष्ट्रवादीतही शरद पवार गट आणि अजित दादा पवार गट तयार झाले. काँग्रेस मध्ये देखील उघड फुट न पडतात, अंतर्गत मोठ मोठे गट कार्यरत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीला या पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात येत आहे. खरं आहे. देश व राज्यातील प्रबळ सत्ताधारी पक्ष हा नेहमीच देशातील व राज्यातील दुब...
बाळासाहेब आंबेडकरांचा अेबीपी माझाला अल्टीमेटम

बाळासाहेब आंबेडकरांचा अेबीपी माझाला अल्टीमेटम

राजकीय
'ध'चा 'मा' करणारी न्यूज चैनल खोडसाळ आणि खोट्या बातम्या दाखवून राजकीय बदनामी करत आहेत असा स्पष्ट आरोप बहुजन वंचित आघाडीने केला आहे. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पंधरा दिवसाचे अल्टिमेटम दिल्याची खोटी आणि खोडसाळ बातमी काल अेबीपी माझा न्युज चॅनलवर दाखवण्यात आली, तसेच त्यांच्या न्युज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. जर कालची पत्रकार परिषद आपण नीट बघितली तर त्यात बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना 'काँग्रेस - राष्ट्रवादी बरोबरची बोलणी 15 दिवसात क्लिअर करून घ्या आणि निवडणुकीच्या तयारीला लागा' असा सल्ला दिलेला आहे, सूचना केलेली आहे. मात्र त्यात कुठेही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 15 दिवसांचे अल्टिमेटम देत असल्याचे म्हटलेले नाही. तरीसुद्धा अति...
बीआरएस आणि वंचित आघाडीला दुर्लक्ष करून चालणार नाही – अजितदादा पवार

बीआरएस आणि वंचित आघाडीला दुर्लक्ष करून चालणार नाही – अजितदादा पवार

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/2019 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवारांना मोठा फटका बसला होता. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) या पक्षाने राज्यात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे. “बीआरएस आणि वंचित आघाडीला दुर्लक्ष करून चालणार नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. तेव्हा अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. उद्याच्या निवडणुकीत बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीला दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही, हे लक्षात ठेवा. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला आहे. 5 ते 10 ...
मंत्रालयाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्याची मागणी

मंत्रालयाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्याची मागणी

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/प्रतिनिधी/पुरोगामी महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचे वारस छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. सहायक अभियंता प्रियंका आठवले फाऊंडेशनच्यावतीनं राज्य सरकारकडे ही मागणी करण्यात आलीय. मॅक्स महाराष्ट्र द्वारा आयोजित विचारांचे संघर्षयोद्धे या परिसंवादामध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या विषयाला वाचा फोडली होती.ते म्हणाले होते, “ महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असल्याचे मानले जाते. शिव, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे असं म्हटलं जातं. पण याच महापुरुषांच्या महाराष्ट्रातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज गायब होत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं परिसंवादातील भाषण 22 जून रोजी मॅक्स महाराष्ट्रवर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. डेप्युटी इंजिनिअर प...
राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

राजकीय
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी, स्वतःला विरोधी पक्ष पदावर जबाबदारी काढुन घेवून ती जबाबदारी इतरांवर देण्याबाबत माध्यमांमध्ये भाष्य केले आहे. खरं तर विरोधी पक्ष नेतेपद सोडण्याबाबत त्यांनी हे विधान नेमकं का केलं याबाबत तर्क वितर्क होत असतांनाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वतःकडे ठेवण्यासाठीच अजितदादांनी हे विधान केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील बहुतांश मुख्य पदांवर श्रीमंत मराठा समाजाला स्थान देण्यात आले आहे. आता देखील प्रदेश अध्यक्ष पदावर अजितदादांनी हक्क सांगायला सुरूवात केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस मधील ओबीसी नेते देखील सतर्क झाले आहेत. ओबीसी नेत्यांनी देखील प्रदेशअध्यक्ष पदावर हक्क सांगत आहेत. राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या पाठोपाठ आता छगन भुजबळ यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक...
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवा, बाळासाहेब आंबेडकरांची आयोगाकडे मागणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले –

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवा, बाळासाहेब आंबेडकरांची आयोगाकडे मागणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले –

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum/पुण्यातील भीमा कोरेगाव येथी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात झालेल्या भीषण दंगली प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगापुढे बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज केले आहेत. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. दरम्यान बाळासाहेब आंबेडकर हे एक निष्णात वकील आहेत. आयोगासमोर कोणाला बोलावावे व कोणास बोलवू नये हे आयोग ठरविते असे त्यांनी नमूद केले आहे....
विरोधकांना निधी मिळू नये म्हणून 2000 च्या नोटा बंद, भाजपचे चोकिंग राजकारण- बाळासाहेब आंबेडकर

विरोधकांना निधी मिळू नये म्हणून 2000 च्या नोटा बंद, भाजपचे चोकिंग राजकारण- बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज,दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई मुंबई/दि/प्रतिनिधी/भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन दिवस आधी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर नोटा जमा करण्याची शेवटची तारीख आहे. सर्व बँकांमधून नोटा जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. एका वेळी एक व्यक्ती 10 नोटा म्हणजे वीस हजार रुपये जमा करू शकतो असे रिझर्व बँकेने जाहीर केले आहे. या निर्णयावर अनेक जाणकारांनी आपले वेग वेगळे मत व्यक्त केले आहे. भाजप सरकारच्या कार्य काळात ही दुसऱ्यांदा नोटबंदी आहे. पहिल्या नोटबंदीच्या काळात जनतेचे खूप हाल झाले. काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्या वेळेस सुध्दा 1000 रुपयांच्या नोटा या चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या त्याचा फायदा आता पर्यंत होत होता का? तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेन...
उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?

उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?

राजकीय
अकोला/दि/ प्रतिनिधी/सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. यावेळी त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली. या निरीक्षणांवरून आमच्या बाजूने निकाल लागल्याच्या प्रतिक्रिया दोन्ही गटांकडून व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले. काल त्यांनी निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर आता वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. आक्रमक भूमिका घ्या -न्यायालयाच्या निर्णयातून आज उद्धव ठाकरे यांना मोठं हत्यार मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. तरचं ते आमदार अपात्र होतील असा जाहीर सल्ला वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषद बोलत होते. हा जाहीर सल्ला देतोय. कारण ज्यावेळी गोंधळला माणूस असतो, त्यावेळी खरी सल्ल्याची गरज असते, अस...
अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहनसोशल मीडियाचा वापर करत दंगल भडकवण्याचा काम सुरू अकोला/दि/ प्रतिनिधी/अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.आज झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मी स्वतः दोन्ही समाज घटकांशी बोलण्याचा मी दिवसभर प्रयत्न करीत होतो. शहरात शांतता राहिली पाहिजे. दरम्यान अकोला शहरात शांतता आली आहे असे दिसत असले तरीही वातावरण तापते आहे असे मला दिसत आहे.हिंदू व मुस्लिम या दोन्ही समुदयांना मी शांततेचे आवाहन करीत आहे. शेवटी या दंगलीतून काहीही निष्पन्न होत नाही, नुकसान हेोते. त्याच्यामुळे यापुढे दंगल होणार नाही याचे दक्षता दोन्ही समाजाने घ्यावी असे आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे....
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum/पर्यायी राजकारण देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला आता नवा चेहरा मिळणार आहे. परदेशात शिक्षण घेऊन परत आलेल्या सुजात आंबेडकर यांनी पुन्हा सक्रीय होत बहुजन कार्यकर्त्यांवर असलेल्या राजकीय गुन्ह्यांचा प्रश्न हातात घेऊन सर्वपक्षीय युवकांना साद घातली आहे. सुजात आंबेडकर यांनी ‘सतरंजी उचल्या' अशी भूमिका असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांवर असलेल्या केसेस चा मुद्दा हातात घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे. राजकीय आंदोलनं असोत, सण असोत किंवा रस्स्त्यावरचा संघर्ष, सामान्य कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असतात. नवरात्र मंडळ, गणपती मंडळ, दहीहंडी मंडळ असो नाही तर मोर्चे आंदोलनं, गुन्हे दाखल होणाऱ्यांमध्ये बहुजन युवक, युवतींचा भरणा जास्त असतो. राजकीय पक्ष ही अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. कोर्टकचेऱ्या आणि पोलिस स्टे...