
सायबर गुन्ह्यांत महाराष्ट्र दुसरा, एनसीआरबीची आकडेवारी
Police mahasanchalak mumbai
पुणे/दि/ प्रतिनिधी/ उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात करण्यात आल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०१७ मधील आकडेवारीवरून समोर आले आहे. महाराष्ट्रात २०१७ मध्ये ३६०४ आणि २०१६ मध्ये २३८० सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. उत्तर प्रदेशात याच वर्षांत अनुक्रमे ४९७१ आणि २६३९ सायबर गुन्हे नोंदवण्यात आले. महाराष्ट्रात मागील सहा वर्षांत दाखल झालेल्या १० हजार ४१९ सायबर गुन्ह्यांमधील ७० टक्के प्रकरणांचा गुंता अद्याप सुटलेला नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे केवळ ०.३ टक्के गुन्ह्यांमध्येच दोषींना शिक्षा झाली आहे. महाराष्ट्र पोलिस दलाच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत राज्यात १० हजार ४१९ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी तब्बल ७२५२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. या काळात २०७९ गुन्ह्या...