
पुण्यात २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची सार्वजनिक दवंडी
j.cp pune
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे आंदोलन, निदर्शने, बंद पुकारणे व उपोषणा सारखे आंदोलनाचे आयोजन करतात. शहर परिसरात ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत बांधकाम हटविण्याच्या कार्यवाहीच्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संभव आहे. तसेच बाल सुरक्षा दिन, महात्मा गांधी जयंती, लालबहाद्दुर शास्त्री जयंती आहे. त्या निमित्त पुणे शहरत पोलीस आयुक्तालयाने पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) व (४) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
दरमन जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, पुणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. तसेच रा...