छुमक छूम नाचे, नाचे… नर्तकी… अन् पब-डान्सबारच्या हिंदोळ्यावर स्वप्निलरावांचे हिंदोळे
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
आमी इंद्राच्या
घरच्या वारांगणा, नाचुनिया खूष करू, सकलजना...चा ठेका धरत... शृंगारातून आले न्हावून,
स्वर्गातल्या मेनके सारखी पर्यंत संध्याकाळी ८ वाजल्यापासून ते पहाटे ४ ते पाच वाजेपर्यंत
विमानतळ पोलीसांच्या साक्षीने पब, डान्सबार, हुक्का पार्लरवर भल्या मोठ्या पगारदारांची
बैठक रंगलेली असते. याच लेटनाईट पार्ट्यांमध्ये मग हळुच हायप्रोफाईल गर्ल्सचा शिरकाव
होतो. बैठक आणखी रंगाला येते. याच पब-डान्सबारच्या हिंदोळ्यावर सध्या विमानतळ पोलीस
स्टेशनमधील स्वप्निलरावांच्या हिंदोळ्याला बहर आला आहे. विमाननगरातील फर्माइश, ऍटमोसफेर
पासून ते दोराबजीच्या गल्लीतील हुक्का पार्लर व इथुन पुढे डझन दोन डझन ठिकाणी बैठकांचे
फड रंगात आलेले असतात. त्याचा त्रास आता विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील वसाहती,...








