पुणे शहरातील पोलीस शिपाई ते एएसआय केडरधारकांच्या मानगुटीवर मास्क दंडाच्या कोट्यवधी रुपये वसूलीचे ओझे
Helment pune
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील दुचाकी वाहन चालविणार्या नागरीकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती करून, हेल्मेट परिधान न करणार्या दुचाकी वाहन चालकांना ५०० रुपये दंडाची आकारणी केली जाते. आता पुणे शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाला असल्याने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क नसल्यास त्याला देखील ५०० रुपये दंडाची तरतूद केली आहे. दरम्यान ज्या विभागात कॅमेरे आहेत, तेथील वाहतुक विभागाला हेल्मेट कारवाईचे दिवसाचे टारगेट देण्यात आले आहे. तसेच मास्क च्या बाबतीत देखील जास्तीत जास्त कारवाई करण्याचे उद्दीष्ट पुणे शहरातील पोलीस शिपाई ते एएसआय केटरधारकांना देण्यात आले असल्यामुळे संपूर्ण शहरात पोलीस आणि नागरीकांत कमालीलीची भांडणे होत आहेत. एवढंच कशाला चार चाकी, वाहनाच्या काचा बंद असतांना देखील, वाहनात बसल्यानंतर देखील मास्क परिधान करणे आवश्यक केले आहे. मास्क नसल्यास वाहनचालकावर कारव...









