कोरोना -लॉकडाऊनच्या काळात पुणे महापालिकेसह राज्य शासनाच्या कार्यालयाकडून शासकीय निधीचा संगनमताने अपहार
पुणे महापालिकेचे परिमंडळ क्र. ३ मधील भ्रष्टाचार शिगेला पोहोचलाधनकवडी - सहकारनगर, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयांची पंचारतीने आरती उतरावी लागेल.कसबा विश्रामबाग-भवानी पेठ क्षेत्रिय अधिकार्यांची खणा-नारळाने ओटी भरायची काय..
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/कोरोना आणि लॉकडाऊनच्या विळख्यात देश-राज्यासह संपूर्ण पुणे शहर अडकलेलं आहे. उद्योग धंदे बंद आहेत, व्यापार ठप्प झालेला आहे. बेरोजगारी कमालिची वाढली आहे. महागाई देखील पराकोटीला पोहोचली आहे. शेतकरी- व्यापार्यांसह बेरोजगार युवक आत्महत्यांकडे वळत आहेत. अशाही परिस्थितीत शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी शासकीय निधीवर डोळा ठेवून, लुटीचे नव नवे विक्रम मोडीत काढत आहेत. शासनातील सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पोलीस, महसुल आणि त्या खालोखाल पुणे महापालिका आणि त्यांची क्षेत्रिय कार्यालयातून महापालिका निधीचा संगनमताने अपहार करण्यात आलेला आहे. मागील दोन व...