मराठा आरक्षण: ५० टक्के मर्यादा, अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र
मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण दिल्लीतील नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. आता अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना मराठा आरक्षणासंदर्भात पत्र लिहिलं आहे. अशोक चव्हाण यांनी या खासदारांना पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली आहे. अशोक चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली आहे.मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिलेला निकाल व त्याअनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर...