
खडकीतील मटका किंग बबलु नायरच्या अड्ड्यावर पोलीसांची धाड— खडकी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर होता धंदा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या र्रफ् कारवाईत अडीज लाख रुपये रोख,
४५ मोबाईल जप्त तर ६३ जणांना अटक
पुणे/दि/ प्रतिनिधी/
खडकी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर बललु नायर याचा जुगाराचा मोठा अड्डा सुरू असल्याची माहिती, पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांना समजल्यानंतर, त्यांनी तत्काळ परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त सप्ना गोरे यांना सदर ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. स्वप्ना गोरे यांनी देखील परिमंडळ एक मधील संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्ग व फरासखान्यातील काही अधिकार्यांना बरोबर घेवून खडकी येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत अडीज लाख रुपये रोख, ४५ मोबाईल सह ६३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बबलु नायर याचा धंदा, पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर रेल्वे स्टेशनजवळ सुरू होता. मटका किंग ही बिरूदावली
मिरविणार्या बबलू नायर याचा हा अ...