Friday, August 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Author: nationalforum

सा.बा. पुणे विभागातील शारंगपानी

सा.बा. पुणे विभागातील शारंगपानी

शासन यंत्रणा
अस्तित्व आयडेंटी पत याचा मागमूस राहिलाच नाही उलट लोकोपकदत अशा अस्तित्वहीन आयडेंटीफाय न होणार्‍या अन् पत तर आख्याआवारातच राहिली नाही. अशाकंडके कुणी ढूंकुनही पाहत नाही की संगतीनं कुणी सुखदुखाःच्या चार ओळी सहानुभूतीने विचारपुसतही नाही. आनंद गमाविलेलं हे टोळकं अंतर्गत संघर्ष, कुरघोड्या याच्यात एवढं गुंतलं गेललं आहे की, त्यांना ह्या सार्‍या घातक स्थितीतून बाहेर कोण काढणार… प्रश्‍न जरी आपल्या भोवती पिंगा घालित असेल तरी हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. कारण ही जी स्थिती निर्माण केली आहे, त्या या स्थितीच स्थित्यंतर घडुन आणणार नाही. उलट अर्थी रोज नव नव्या युक्त्या शोधून या टोळक्यांच्या मेंदूत पाणी वहाव असंच त्यांला वाटते. कारण हे टोळकं शहाणसुरतं झालं तर त्यांचच अस्तित्व टांगणीला लागणार आहे. ज्याला उत्तर शोधायचे आहे त्याला हा पत्ता देता येईल. १९४६ ची बिल्डींग सा. बां. पुणे विभाग. १९४६ च्य...
पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, बीपीसीएल कर्मचार्‍यांचा संप,  इंधन टंचाईची शक्यता

पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, बीपीसीएल कर्मचार्‍यांचा संप, इंधन टंचाईची शक्यता

राजकीय
मुंबई/दि/ केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतल्या नंतर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. या खाजगीकरणाला कंपनीच्या कर्मचार्यांनी विरोध केला आहे. मनमाडजवळच्या पानेवाडी टर्मिनल येथील बीपीसीएल कर्मचार्‍यांनी आज गेट बंद आंदोलन छेडत केंद्र सरकारने केलेल्या खाजगीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीतील सर्वच कर्मचारी एकत्रित आंदोलनात उतरल्याने सकाळपासून बीपीसीएल कंपनीतून एकही टँकर इंधन भरुन बाहेर पडलेला नाही. पानेवाडी टर्मिनलमधून उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भ अशा भागात इथून इंधन भरुन टँकर जातात. मात्र आज सकाळपासून एकही टँकर भरुन गेलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून हे आंदोलन आज दिवसभर सुरु राहणार आहे. दिवसभरातून या प्रकल्पातून ४०० टँकर भरुन बाहेर पडत असतात. आज मात्र सर्व टँकर पार्किंगमध्ये उभे असल्याचं चित्र पाह...
चार वर्षांत देशात १५०० बालविवाह,  महिला व बालविकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण

चार वर्षांत देशात १५०० बालविवाह, महिला व बालविकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण

सामाजिक
नवी दिल्ली/दि/ सन २०१३ ते २०१७ या कालावधीत देशभरात बालविवाहाची दीड हजारांहून अधिक प्रकरणे उघड झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात इराणी यांनी बालविवाहांबाबतची गेल्या पाच वर्षांतील माहिती सादर केली. बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणे सन २०१७ मध्ये ३९५ प्रकरणे उघड झाली. सन २०१६ मध्ये हे प्रमाण ३२६, सन २०१५ मध्ये २९३, २०१४ मध्ये २८० आणि २०१३ मध्ये २२२ इतके होते, असे इराणी यांनी ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या माहितीच्या आधारे सांगितले. सन २०१७ मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले. त्यााधीच्या चार वर्षांमध्ये त्याबाबत तमिळनाडू आघाडीवर होते, असेही इराणी म्हणाल्या....
पुणेकर…. पुणे महापालिका…. व नॅशनल फोरम वृत्तपत्र

पुणेकर…. पुणे महापालिका…. व नॅशनल फोरम वृत्तपत्र

शासन यंत्रणा
पुणे महानगरपालिकेच्या दरवर्षीच्या अंदाजपत्रकात, स्वतःच्या वॉर्ड प्रभागातील विकास कामांची तरतुद करणे आणि दिवाळी पासून शिमग्यापर्यंत बहुतांश कामांची अदला-बदली व निधीचे वर्गीकरण करण्याचा सपाटा सध्या पुणे महापालिकेतील नगरसेवकांनी सुरू केला आहे. अंदाजपत्रकातील बहुतांश कामे व निधीची पळवा-पळवी ही तर पुणे महापालिकेची खासियतच म्हणावी लागेल. निविदा कामांकडे काही नगरसेवक मंडळींचा भलता लळा आहे. एखादा कंत्राटदार माननियाविरूद्ध मुजोर झाल्यास, त्याला काढुन दुसर्‍याला संधी देताना कामांचीच अदलाबदल केली जाते तर निधीचीही पळवा पळवी होते. काही नगरसेवक स्वतःच कंत्राटदार आहेत. तर काही नगरसेवक ही बांधकाम व्यावसायिक किंवा बांधकाम व्यवसायातील पार्टनर आहेत. काही नगरसेवक मंडळी हॉटेल लाईनसह लहान मोठया उद्योगात मग्न आहेत. थोडक्यात सर्व नगरसेवक बिझनसमन आहेत. नगरपिता किंवा नगराचा सेवक ही बिरूदावली निव्वळ नावालाच राहिली...
लेखापरीक्षकांच्या आक्षेपांची पुर्तता नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही, बेकायदा बांधकामांवर देखील कारवाई नाही, – आता … मुजोर अभियंत्यांचा सत्कार नेमका कोणत्या शालजोडीने करावा…

लेखापरीक्षकांच्या आक्षेपांची पुर्तता नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही, बेकायदा बांधकामांवर देखील कारवाई नाही, – आता … मुजोर अभियंत्यांचा सत्कार नेमका कोणत्या शालजोडीने करावा…

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांचे ऑडीट अर्थात लेखापरीक्षण केले जाते. ज्या खात्यांनी पुणे महापालिकेचे हित लक्षात न धेता विशिष्ठ वर्गाला अधिकचा लाभ देवून, पुणे महापालिकेचे नुकसान केले, त्या बाबतचे आक्षेप नोंदवून त्या रकमा संबधित खात्याने वसुल करण्याबाबतचे निदेश दिले जातात. ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे कोट्यवधी रुपयांचे येणे आहे, त्या रकमा बांधकाम विभागासह अन्य विभागांनी वसुल केलेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. अनाधिकृत बांधकामाबाबत मागील १५ वर्षांपासून उच्च न्यायालय, राज्य शासनाने वेगवेगळ्या आदेशांव्दारे कारवाईचे आदेश दिले आहेत. तथापी त्याची अंमलबजावणी देखील बांधकाम विभागाकडुन केली जात नाही. नागरीकांनी तक्रारी नोंदविल्यानंतर निव्वळ नोटीसा देण्याचे काम केले जाते, परंतु कारवाई केली जात नाही. महापालिका आयुक्त कार्यालय व शहर अभियंता कार्यालयास दर मंगळवारच्या ...
बिबवेवाडीत बेकायदा मंदिर व बेकायदा बांधकामांना संरक्षण दिल्या प्रकरणी अभियंता राखी चौधरी यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी

बिबवेवाडीत बेकायदा मंदिर व बेकायदा बांधकामांना संरक्षण दिल्या प्रकरणी अभियंता राखी चौधरी यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी

सर्व साधारण
unligal mandir pmc पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुण्यातील बहुतांश सर्व पेठांमध्ये भगवान शंकर, गणपती व मारूतीची अनेक मंदिर आहेत. सोमवार मंगळवार कसब्यात तर जागोजाग शिवमंदिर शिवलिंग आहेत. त्यातील काही समाधीस्थळ आहेत. मारूतीची तर प्रत्येक ठिकाणी मंदिर आहेत. गणपतीसह विविध देवी देवतांची मंदिर आहेत. जुन्या काळातील मस्जिद व दर्गा आहेत. परंतु १९९० नंतर जागतिकीकरणानंतर देवी देवतांचे अधिक महत्व वाढले. त्यामुळे पुण्यातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिर - मस्जिदची संख्या पाच हजार पटींनी वाढली. पुण्यातील सोमवार, मंगळवार व रास्तापेठेत जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे त्यांच्या धंद्यासाठी रस्त्यावरच साईबाबा, स्वामी समर्थ व गजानन महाराज व गणपतीची मंदिर उभी करण्यात आली. पुण्यातील ५०० ते ६०० झोपडपट्यांमध्ये तर एका एका गल्ली बोळात विविध देवी देवतांची मंदिर, मस्जिद व इतर धर्मियांची प्...
राज्यातील ७ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

राज्यातील ७ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

सामाजिक
पुणे/दि/ केंद्र सरकारने बाजार समित्या बरखास्त करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ‘ई-नाम’वर व्यवहार करण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र, बाजार समित्या बरखास्त करून शेतकर्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व राज्यातील सुमारे ७ हजार बाजार समित्यांच्या कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’सारखी नवीन योजना आणून सुधारणा गरजेची आहे. मात्र, बरखास्त केल्यानंतर कोणती बाजार व्यवस्था अस्तित्वात येणार, याबाबतचे गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांच्या मालाची लुबाडणूक होऊ नये, त्याच्या मालाला योग्य किंमत मिळावी, किंमत मिळण्यासाठी लिलाव पद्धतीत स्पर्धा व्हावी, शेतकर्‍यांच्या मालाचे पसे मिळण्याची हमी देता यावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा १९६४ मध्ये करण्यात आला. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी १९६७ मध्ये झाली. या बाज...
केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमधील  ७ लाख पदे रिक्त

केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमधील ७ लाख पदे रिक्त

शासन यंत्रणा
नवी दिल्ली/दि/ गेल्या वर्षी १ मार्च रोजीच्या स्थितीनुसार, केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ७ लाख पदे रिक्त होती, अशी माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. एकूण ६ लाख ८३ हजार ८२३ पदांपैकी, ५७४२८९ पदे गट ‘क’ मधील, ८९६३८ पदे गट ‘ब’मधील, तर १९८९६ पदे गट ‘अ’ मधील आहेत. १ मार्च २०१८ रोजीची ही आकडेवारी आहे, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. संबंधित विभागांनी उपलब्ध करून दिलेल्या या आकडेवारीच्या आधारे कर्मचारी निवड आयोगाने २०१९-२० या वर्षां १०५३३८ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असल्याचेही सिंह म्हणाले. नव्या, तसेच येत्या दोन वर्षांमध्ये उद्भवणार्या रिक्त जागा लक्षात घेऊन २०१७-१८ या वर्षांत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे निवड मंडळ यांनी गट ‘क’ आणि स्तर-१ मिळून एकूण १२७५७३ रिक्त जागांसाठी केंद्रीकृत भरती अ...
महाराष्ट्रातील सत्तेची लंगडीपानी… राजकारण घाला चुलीत…

महाराष्ट्रातील सत्तेची लंगडीपानी… राजकारण घाला चुलीत…

राजकीय
महाराष्ट्रात सध्या सत्तेची लंगडीपानी सुरू आहे. सत्तेची आंधळी कोशिंबीर सुरू आहे. आमदारांना पोरींसारखं इकडुन तिकडं हॉटेलात पाठवलं जात आहे. कधी कोण पळुन जाईल आणि दुसर्‍याबरोबर निकाह करतील ह्याचा काही भरवसा देता येत नसल्याने सर्वजण आमदारांवर लग्नाच्या पोरीसारखं लक्ष देवून आहेत. तिकडं अजितरावांनी मी राष्ट्रवादीतच आहे, नव्हे ती राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे अस्सं दणकुण सांगितलं आहे. कधी कधी अस्सं वाटतय की, ही खेळी शरद पवार यांची तर नाहीये ना… पण काहीच उत्तर मिळत नाहीये… सध्या राज्यात काही ठिकाणी ओला दुष्काळ पडला आहे तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे. शेतकर्‍यांच्या हातातुन पिक निघुन गेले आहे. तिकडे बाजारात भाज्यांसहीत कडधान्याचे भाव वाढत आहेत. व्यापारी साठा करण्याच्या तयारीत आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष नेमकं कुठं चाललयं हेच समजत नाहीये. पुण्यातील बाजारपेठांमध्ये धान्याची आवक होत आहे,...
बुधवार व शुक्रवार पेठा हे तर पुणे शहराचं हार्ट- आगरवाल टोळी ही तर विजापुरच्या आदिलशहापेक्षाही भयंकर

बुधवार व शुक्रवार पेठा हे तर पुणे शहराचं हार्ट- आगरवाल टोळी ही तर विजापुरच्या आदिलशहापेक्षाही भयंकर

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/ पुणं शहर हे मूळातच एक सुंदर शहर आहे. एकापेक्षा एक वेगवेगळे वाडे आणि त्यांची रचना, वेगवेगळी आखिव- रेखिव मंदिर, वेगवेगळे दर्गा आणि मस्जिद, चर्च ह्यांची देखील एक सुंदर रचना आहे. प्रत्येक वाड्यात आखिव- रेखीव सुंदर पाण्याच्या विहीरी आहेत. मुळा मुठा नदीवर एक राजा महाराजांची वेगवेगळी बघण्यासारखी समाधीस्थळ आहेत. रस्त्यांची सुबक रचना. तसेच बाजारपेठांचं एक वेगळं अस्तित्व आहे. पुणं शहर भलं मोठ्ठं झालं तरी मंडई, लक्ष्मी रोड वर आल्याशिवाय पुणेकरांचा एक दिवसही जात नाही. निदान सणावाराला तरी पुणेकर ह्या रस्त्यावर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या पुण्याची मुहूर्तमेढ सोन्याचा नांगर फिरवुन, पुनवडीला पुण्यनगरीचं स्थान निर्माण केलं आहे. अशा ह्या पुणे शहरावर मोघलांसह ब्रिटीशांनी देखील आक्रमणे केली, परंतु पुणे शहर हादरलं नाही, घाबरलं नाही. पानशेतच्या प्रलयानंतर २०११ पासून प...