Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

भारती विद्यापीठ वाहतुक विभाग, काहीही करा- हम सुधरेंगे नही म्हणे नहीच…

Bharti-Vidyapeeth-Police

पुणे/ दि/ प्रतिनिधी/

            भारती विद्यापीठ वाहतुक विभागाच्या कृत्य व अकृत्यांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि एस.टी. महामंडळाचे अतोनात नुकसान होत आहे. या गैरवाजवी आर्थिक नुकसानीस एस.टी. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच भारती विद्यापीठ वाहतुक पोलीस जबाबदार असून, दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केली आहे.

            दरम्यान भारती विद्यापीठ वाहतुक पोलीसांच्या दुष्कृत्यांचा पंचनामा प्रसिद्ध होवून दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आहे. तरीही त्यात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. आजही नवीन पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर पांढर्‍या पिवळ्या रंगाची चार चाकी आठ ते दहा आसनी कार संवर्गातील वाहनांतुन अवैध व चोरटी वाहतुक सुरू आहे. तसेच कात्रजच्या मुख्य चौकातून तीन आसनी व सहा आसनी रिक्षांतून कात्रज स्वारगेट अशी चोरटी वाहतुक सातत्याने सुरू आहे.

            दरम्यान कात्रज चौकातून मुंबईकडे जाणार्‍या महामार्गावर आता नव्याने मोठ्या बसेस दाखल झालेल्या आहेत. तसेच नवीन व्यावसायिक तयार झाले आहेत. यापूर्वी जे चोरटी वाहतुक करीत होते, त्यात नव्या उद्योजकांची भर पडली आहे.

            चोरट्या वाहतुकीस नव-नवीन स्टेशन उभी केली जात आहेत. हा सर्व प्रकार भारती विद्यापीठ वाहतुक पोलीस व एस.टी. महामंडळातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संगनमतातून होत आहे हे आता नव्यान सांगण्याची गरज नाहीये.             शासनाचा गैरवाजवी आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ  वाहतुक पोलीसांविरूद्ध नॅशनल फोरमध्ये वृत्त प्रसारीत झाल्यानंतर, पोलीस आयुक्त कार्यालयातील वाहतुक उपायुक्तांसमोर काही संघटनांनी निदर्शने केली आहेत. शिवाय या दुष्कृत्यांना पोलीस कर्मचारी श्री. कमाने, दिसरे, शिंदे यांच्या विरूद्ध सज्जड असे पुरावे वाहतुक पोलीस  उपायुक्तांना सादर करून देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.