Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतील कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी उदया 1 मे रोजी मोर्चा व सभा !

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
भारतात 1 मे 1923 पासून जागतिक कामगार दिन साजरा करण्यात येतो, यंदाचा कामगार दिवस शतकपूर्ती साजरा करणार आहे. तरीदेखील नागरिकांच्या सेवेत 12 महीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्षे या प्रश्नांकारिता आपण वेळोवेळी आवाज उठवत आलेलो आहोत. मात्र आता या ढिम्म प्रशासनाच्या कारभारामुळे कामगार दिनीच कामगारांना त्यांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. आपल्या सर्व कामगारांचे प्रतीक असलेल्या कामगार पुतळ्यासमोर आपण 1 मे ,सोमवार रोजी आपल्या न्याय व हक्कांसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. 1 मे 2023 ला सकाळी 10 वाजता श्रमिक भवनपासून मोर्चाला सुरुवात करून आपण सगळे कामगार पुतळ्यापर्यंत जाणार आहोत. तरी सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कामगार युनियनने केले आहे.

मोर्च्यातील प्रमुख मागण्या :
1.कायम सफाई कर्मचाऱ्यांचा वारस हक्क अबाधित राहिलाच पाहिजे.
2.कंत्राटी कामगारांचा पी.एफ., इ.एस.आय.चा भरणा वेळेवर झाला पाहिजे.
3.अतिक्रमण, घरपाड़ी, म.न.पा. प्रेस , शिक्षण मंडळातील रोजंदारी कर्मचारी व बालवाड़ी शिक्षिका व सेविकांना कायम करा.
4.2005 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू करा.
5.1 जानेवारी 2016 नंतर पुणे महानगरपालिकेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन समान करा.
6.पुणे महापालिकेतील सर्व खात्यातील रिक्त पदे भरा.
7.1 नोव्हेंबर 2005 नंतर कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2023 च्या शासन नियमाप्रमाणे निवृति वेतन,रुग्ण निवृति वेतनाची अंमलबजावणी पुणे महानगरपालिकेने करावी.
8.चतुर्थ श्रेणीतील कायम कामगारांना व
कामगारांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती द्या.
9.कंत्राटी कामगारांचे बंद केलेले घरभाडे, रजावेतन, बोनस तात्काळ सुरू केले पाहिजे.
अशा मागण्या असून, याबाबत आंदोलन केले जाणार आहे.