
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
आंध्र प्रदेश, ओडीसा राज्यातून गांजा अंमली पदार्थाची विक्री पुण्यात करणाऱ्या पाहिजे आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. दोन यांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरामध्ये परराज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या संघटित टोळी विरोधात प्रभावी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पुणे शहर पोलीसांनी दिली आहे.
वानवडी पोलीस स्टेशन, मध्ये गु.र.नं. 364/2026 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 20(ब) व 29 प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी दिपक आबाजी तुपे, (वय 39 वर्षे, रा. लेन नं. 01, राजस सोसायटी, गणपती मंदिराजवळ, विद्यानगर कात्रज, पुणे) यास अंमली पदार्थ विरोधी पथक 02. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे सोलापुर महामार्गावर पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले असुन दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आलेली आहे.
आरोपी विरुद्ध यापुर्वी आंध्र प्रदेश राज्यात व्यापारी प्रमाणातील एन.डी.पी.एस. कायद्यांन्वये दाखल दोन गुन्हयात अटक करण्यात आलेली होती. आरोपी हा ओडिसा राज्यातुन गांजा आणण्याकरीता गेला असताना त्याचे साथीदार दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी व्यापारी प्रमाणातील गांजासह पकडले गेल्याने तो महाराष्ट्र राज्यामध्ये परत आला होता. गोपनिय बातमीच्या आधारे त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेण्यात आले. या कारवाई मुळे पुणे शहरामध्ये परराज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या संघटित टोळी विरोधात प्रभावी कारवाई करण्यात येत आहे.
सदर आरोपीस पुणे शहर पोलीसांकडून प्रथमच अटक करण्यात आलेली असुन तो चंदननगर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीतील एन.डी.पी.एस गुन्हयातील पाहिजे आरोपी आहे. त्यास दोन्ही गुन्हयामध्ये वर्ग करुन अटकेबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. आरोपीस वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. 364/2026 या गुन्हयात अटक करुन न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त. गुन्हे तेजस्वी सातपुते मॅडम, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर अति कार्यभार (गुन्हे) श्री विवेक मासाळ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे-3. श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, तसेच पोलीस अंमलदार योगेश कुंभार, सतीश चव्हाण, शरद धांडे, सुमित यादव प्रशांत कळसकर संदिप देवकाते, विनोद निभोरे, अजिंक्य जोजारे, अमोल गायकवाड, अमोल मुंढे व देवीदास वांढरे तसेच महिला पोलीस अंमलदार सुरेखा साबळे, सुकेशिनी आंबले, आरती दिवेकर अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.
