
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील बुधवारपेठ रेड लाईट भागामध्ये चालणारे गैरव्यवहार व गैरकायदेशीर कृत्य याबाबत पोलीसांनी मोठ्ठे कोबिंग ऑपरेशन राबविले.यात पुणे शहर आयुक्तालयातील दोन पोलीस उप-आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली विविध पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेकडील आठ सहा पोलीस आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 55 सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप-निरीक्षक, 375 अंमलदार यांचे मार्फतीने कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
कोबिंग ऑपरेशन दरम्यान 41 इमारतींची तपासणी करण्यात आली असुन एकुण 426 महिला व 290 पुरुष चेक करण्यात आले तसेच लावण्यात आलेल्या 05 नाकाबंदी ठिकाणी एकुण 459 पुरुष व 32 वाहने चेक करण्यात आली आहे. नाकाबंदी दरम्यान हॉटेल चेतक समोरील सार्वजनिक रोडवर स.नं.1058 बुधवारपेठ पुणे येथे इसम नामे रामेश्वर विभीषण बिराजदार, (वय 31 वर्षे, रा. गणराज हॉटेलच्या पाकींगमधील रुममध्ये, बाजीराव रोड पुणे, मुळगाव तांबरवाडी, ता. औसा, जि. लातुर) याच्या ताब्यात 07 ग्रॅम चरस कि.रु.3 हजार 500 रुपये व 03 इंजेक्शन किं.रु.55 रूपये असा मुद्देमाल अनाधिकारने जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क), 20 (ब) () (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान 02 संशयित बांगलादेशी महिला व काही अल्पवयीन मुली मिळून आल्याने त्यांना पुढील सुरक्षेच्या कारणास्तव फरासखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन खातरजमा करण्यासाठी पोलिस स्टेशनच्या मार्फत कारवाई चालु आहे.
वरील नमुद कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील पोलीस उपआयुक्त परि-01, पुणे शहर श्री. ऋषीकेश रावळे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना श्रीमती अनुजा देशमाने, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे 1. श्री. शैलेश संखे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे 3 श्री. शंकर खटके, सहा पोलीस आयुक्त सिंहगड रोड श्री. अजय परमार, सहा पोलीस आयुक्त स्वारगेट, श्री. राहुल आवारे, सहा पोलीस आयुक्त लष्कर, श्रीमती संगिता अल्फानसो शिंदे, सहा पोलीस आयुक्त येरवडा, श्री. सुनिल जैतापुरकर तसेच विविध पोलीस स्टेशनकडील 19 पोलीस निरीक्षक, 55 सहा. पोलीस निरीक्षक/पोलीस उप-निरिक्षक, 375 पोलीस अंमलदार यांनी केली.
