Thursday, July 31 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

तडीपार आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वावर, गुन्हे युनिट 3 ने कारवाई करीत तडीपारास केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात तडीपार आरोपींचा वावर असल्याचे पुन्हा समोर आले आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपी त्याच्या पत्नीस सिंहगड रोड येथे कामावर सोडण्यासाठी येत असतो अशी माहिती मिळाल्याने गुन्हे युनिट 3 कडील पथकाने त्याचा अचुक शोध घेवून त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

पो स्टे हददीमध्ये गंभीर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणून अभिलेखावरील तडीपार, मोक्का, पाहीजे आरोपी यांचा शोध घेवून कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी मुफजल आदेश दिल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणेकामी गुन्हे शाखा युनिट 3 मधील सपोफौ शिंदे, पो हवा कैलास लिम्हण, पो हवा अमोल काटकर, पो हवा किशोर शिंदे, पो.शि योगेश झेंडे, पो.शि तुषार किंद्रे असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पो हवा कैलास लिम्हण व पो शि किंद्रे यांना सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तडीपार आरोपी नामे गणेश दिलीप म्हसकर, (रा. रामनगर, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) हा पुणे मध्ये आलेला असुन तो त्याची पत्नी हीला संतोष हॉल, सिंहगड रोड येथे कामावर सोडण्यासाठी येत असतो अशी माहिती मिळाली.


त्यानुसार गुन्हे युनिट 3 कडील पथकाने नमुद इसमाचा शोध घेतला असता, एक इसम संतोष हॉल सिंहगड रोड येथे मिळून आला. त्याला कोथरूड येथील गुन्हे युनिट 3 कडील कार्यालयात आणून त्याची  विचारपूस केली असता, तो कोणाच्याही परवानगी पुणे शहरात व हद्दीत आला नसल्याचे त्याने सांगितले. यावेळी तत्काळ त्याला सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले. 

ही कामगिरी पंकज देखमुख (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा), निखिल पिंगळे(पोलीस उपआयुक्त,गुन्हे शाखा), राजेंद्र मुळीक (सहा पोलीस आयुक्त गुन्हे 1) यांच्या सुचनेनुसार भाऊसाहेब पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे युनिट 3), सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, सापोफौ पंढरीनाथ शिंदे, पो. हवा. अमोल काटकर, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, पो.शि.योगेश झेंडे व तुषार केंद्रे यांनी कामगिरी केली आहे.