
पुणे महापालिका आयुक्त हे काही फक्त टपाल कार्यालय आहे काय?
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहरातील मूलभूत नागरी समस्या तसेच या नागरी समस्या सोडविण्यात ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसुरी केली आहे, त्यांच्याविरुद्ध पुणेकर नागरिक, सामाजिक, पर्यावरणवादी संघटना, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून पुणे महापालिका आयुक्तांच्या नावे तक्रार अर्ज दिले जातात. त्यानुसार तक्रार अर्जांवर तातडीने कार्यवाही होऊन, संबंधित नागरिकांसह पदाधिकाऱ्यांना दिलासा तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई व्हावी असे अपेक्षित असते. तथापि पुणे महापालिका आयुक्त कार्याकडून तक्रार अर्जांवर कार्यवाही केली जात नाही. संबंधित तक्रार अर्जांवर कोणताही शेरा न मारता ते अर्ज संबंधित खातेप्रमुख किंवा विभागाकडे परस्पर पाठवून दिले जातात. पुणे महापालिका आयुक्त कार्यालयाकडून तक्रार अर्जांवर कुठल्याही प्रकारचा शेरा न मारल्यामुळे संबंधित विभाग किंवा कार्यालय ...