स्वारगेटचा एसटी स्टँड-सहकारनगरचा बस स्टँड, दोन्हीकडे प्रवाश्यांची लुटालुट,खरा आरोपी का सापडत नाही …
सहकारनगर पोलीस स्टेशन *स्वारगेट पोलीस स्टेशन *बंडगार्डन पोलीस स्टेशन *वारजे माळवाडी पोलीस स्टेशन *वानवडी पोलीस स्टेशन
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील आजच्या गुन्हेविषयक घडामोडींमध्ये नेहमीप्रमाणे स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील स्वारगेट एसटी स्टँड आणि सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील के.के. मार्केट, बालाजीनगर मध्ये सार्वजनिक वाहनातून नागरीक प्रवास करीत असतांना, त्यांच्यावर दरोडे पडले आहेत. तर बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत एका 50 वर्षीय महिलेचे 1 लाख 44 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्राची चोरी झाली आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीतही सोनाराच्या दुकानात महिलांनी सोने खरेदीच्या बहाण्याने 2 लाख 35 हजार रुपयांची चोरी केली आहे, तर वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत मारहाण व शिवीगाळीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत शेकडो गुन्ह्यांची नोंद होते...
