
सिंहगड क्षेत्रिय कार्यालय हद्दीत जाईन तिथे कचराच कचरा, तरीही यु.आर. फॅसिलिटी या ठेकेदाराची कोट्यवधी रुपयांची बीले मंजुर होतात तरी कशी…?
नॅशनल फोरम/पुणे/दि/ Aniruddha Shalan Chavan/पुणे महापालिकेचे पैसे झाडाला लागल्यासारखे, ठेकेदारांची कोट्यवधी रूपयांची बीले मंजुर केली जात आहेत. परंतु ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यासह कायम बिगारी सेवक हजर आहेत की नाही याची पाहणी करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, तेच काही मोकादम, काही एसआय बोगस हजेऱ्या लिहून पुणे महापालिकेची फसवणूक करीत आहेत. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या व पुणे महापालिका घनकचरा विभागाच्या महापालिका सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार- पवार ह्या आज दि. 23 जुलै 2025 रोजी आरोग्य कोठीवर येवून निव्वळ हजेरी रजिस्टरची पाहणी केली आहे. त्यांनी मागे देखील इतर आरोग्य कोठ्यांतील हजेरी रजिस्टरची पाहणी केली, परंतु हद्दीत फिरून, हद्द स्वच्छ आहे की नाही याची पाहणी केली नाही. निव्वळ आरोग्य कोठ्यांवर हजेरी रजिस्टर पाहून पुणे शहर स्वच्छ होणार नाही, तर हद्दीत पाहणी करून दोषी असलेल्यांवर कारवाई केल्याखेरीज क...