Tuesday, January 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: punemanapa

वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दरदिवशी 80 मे.टन ओला कचरा येतो तरी कुठून….?कसा होणार … नवल किशोर रामांच्या स्वच्छतेचा पुणे पॅटर्न…?

वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दरदिवशी 80 मे.टन ओला कचरा येतो तरी कुठून….?कसा होणार … नवल किशोर रामांच्या स्वच्छतेचा पुणे पॅटर्न…?

सर्व साधारण
नॅशननल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आणि अति. आयुक्त पवनित कौर यांनी पुणे शहराला स्वच्छतेत टॉप स्थानावर ठेवण्यासाठी व देशात पुणे शहर हेच स्वच्छतेचा पॅटर्न म्हणून ओळखला जाईल यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. आयुक्त आणि अति. आयुक्त यांच्या कार्यालयात घनकचरा विभागाच्या बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू असते. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर कार्यरत असणारे घनकचरा विभागाकडून येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविल्या जात आहेत. कचऱ्यासाठी किंवा कचऱ्याच्या वाहतुकीसाठी वाहने कमी पडत आहेत असा बैठकीत सुरू आल्यानंतर, आयुक्तांनी तत्काळ भाडे तत्वावर लहान वाहने घेण्याचा निर्णय घेवून 24 तासात 48 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. घनकचरा विभागाचा एकही शब्द आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त खाली पडू देत नाहीत. पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आयुक्त कार्यालय कमालिचे दक्ष झालेले असतांना, वारजे क...
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काका-पुतण्यासह, काँग्रेस-मनसे-ठाकरे सेनेच्या युतीला पुणेकरांनी दाखविला कात्रजचा घाट

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काका-पुतण्यासह, काँग्रेस-मनसे-ठाकरे सेनेच्या युतीला पुणेकरांनी दाखविला कात्रजचा घाट

सर्व साधारण
काँग्रेसला 15 तर शिंदेसेना व मनसेला भोपळाही फोडता आला नाही, बारामती पार्टी 26+3काँग्रेसला वंचितची मते हवीत परंतु उमेदवार नको म्हणणाऱ्यांना पुरोगामी आंबेडकरी जनतेचा जोर का झटका नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाने एकहाती सत्ता खेचून आणली आहे. भाजपा-आठवले गटाने 120 जागा पदरात पाडून, आम्हाला आता कोणत्याही पक्षाची गरज नसल्याचे भाजपाने दाखवुन दिले आहे. तिकडे निवडणुकीच्या तोंडावर दोन राष्ट्रवादी एकत्र आणून निवडणुकीसाठी सामोरे गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः धुळदाण उडाली आहे. पुण्यामध्ये मोठा बोलबाला करूनही तसेच साम,दाम,दंड भेद नितीचा वापर करूनही अजित पवारांच्या हाती नेमकं लागलं तरी काय हे आत्तापर्यंतच्या मनसुब्यातून विचारणा करण्याची वेळ आली आहे. शरद पवार 3 तर अजित पवार गटाला 26 जा...
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात लोकशाहीचा महाउत्सव, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात लोकशाहीचा महाउत्सव, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. तर काही भावी इच्छुक उमेदवार कोणती आघाडी कशी होते याची वाट पाहत वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत वावरत आहेत. परंतु पुणे महापालिकेच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त श्रीमती सुरखा भणगे यांनी सार्वत्रिक निवडणूकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. भावी नगरसेवकांच्या सुविधेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. संपूर्ण धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रांगणात भव्य-दिव्य मंडपाची उभारणी केली असून, जसे काय एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या वा राजकीय नेत्याच्या मुला-मुलीच्या विवाहाची तयारी आहे की काय असा भास होत आहे. सर्वत्र एखाद्या विवाहासारखी लगबग सुरू आहे. खऱ्या...
पुणे महापालिका हद्दीत अनाधिकृतपणे बीडब्ल्युजी संकलन व प्रक्रिया करणाऱ्या खाजगी संस्थांची कामे बंद करण्याच्या आदेशाला आरोग्य निरीक्षकांकडून हरताळ

पुणे महापालिका हद्दीत अनाधिकृतपणे बीडब्ल्युजी संकलन व प्रक्रिया करणाऱ्या खाजगी संस्थांची कामे बंद करण्याच्या आदेशाला आरोग्य निरीक्षकांकडून हरताळ

सर्व साधारण
एसआय-डीएसआयची मनमानी, 15 क्षेत्रिय कार्यालय हद्दीतून दरदिवशी प्रत्येकी 100 मे.टन कचऱ्याचा नजराणा, कसा होणार… स्वच्छतेचा पुणे पॅटर्नस यशस्वी… नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत बल्क वेस्ट जनरेटर्स मधील कचरा संकलन व प्रक्रिया करणाऱ्या अनाधिकृत खाजगी संस्थांची पाहणी करून त्यांचे कामकाज तत्काळ बंद करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी 17 नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. तथापी 3 डिसेंबर रोजी उपआयुक्त घनकचरा यांच्या आदेशाने काढण्यात आलेल्या आदेशाला पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी हरताळ फासल्याचे समोर आले आहे. आता जो पर्यंत धडक कारवाई होत नाही व जो पर्यंत एसआय-डिएसआय सह मुख्य आरोग्य निरीक्षकांचे अनधिकृत खाजगी संस्था बरोबरचे खाजगी कनेक्शन तोडले जात नाही तो पर्यंत पुणे शहरातील कचऱ्याची समस्या संपणार नसल्याचे चित्र दि...
एका दिवसात 2500 अनाधिकृत फ्लेक्स बॅनरवर कारवाई करणारे माधव जगताप, बिबवेवाडीतील थकित 2 कोटी रुपये वसूल करणार की त्यावर पाणी सोडणार…?

एका दिवसात 2500 अनाधिकृत फ्लेक्स बॅनरवर कारवाई करणारे माधव जगताप, बिबवेवाडीतील थकित 2 कोटी रुपये वसूल करणार की त्यावर पाणी सोडणार…?

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे उपआयुक्त श्री. माधव जगताप यांनी अतिक्रमण व टॅक्स विभागात केलेल्या गलथान कारभारामुळे पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊन जनमानसात पुणे महापालिकेची प्रतिमा मलिन केली म्हणून तत्कालिन आयुक्तांनी माधव जगताप यांची बदली करून दोन इन्क्रीमेंट स्टॉप करण्याची शिक्षा देण्यात आली होती. आता पुन्हा सहा महिन्यानंतर श्री. माधव जगताप यांच्याकडे आकाशचिन्ह विभागाचा पदभार देण्यात आलेला आहे. त्यांनी आकाशचिन्ह विभागात पाय ठेवता क्षणीच पहिल्याच महिन्यात व एकाच दिवसात, पुणे शहरातील सुमारे 2500 फ्लेक्स बॅनर्स, होर्डींग काढून टाकल्याच्या व जे अनाधिकृत बोर्ड बॅनर्स लावतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे व दंडात्मक कारवाई करणर असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांना देण्यात आली आहे. त्यानुसार काही वृत्तपत्रांसह काही न्यूज पोर्टलवर त्यांच्या ह्या बातम्या फोटोसहित प्रसारित करण्यात आल...
10 लाखाचं काम काढून 70 लाखाला चूना लावायचा, पुणे महापालिकेचे लाखाचे 12 हजार करणे विद्युत विभागाचे गुणवंत अभियंते,

10 लाखाचं काम काढून 70 लाखाला चूना लावायचा, पुणे महापालिकेचे लाखाचे 12 हजार करणे विद्युत विभागाचे गुणवंत अभियंते,

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-पुणे महापालिकेने वॉर्ड ऑफिस, उपआयुक्त कार्यालयांसह खाते प्रमुख, विभाग प्रमुखांना निश्चित रकमेच्या निविदा मंजूर करण्याचे अधिकार सुपूर्द करण्यात आले आहेत. दरम्यान कुठे काम करावे, कुठे निविदा कामे करू नये, पुणे महापालिका निधीचा वापर करतांना त्याबाबत निश्चित अशी धोरणे सुधारित निवेदेत नमूद आहेत. तसेच एकाच कामावर पुन्हा दुसरे काम करू नये, क्षेत्रिय कार्यालयांनी निविदा कामे केल्यानंतर त्याच कामावर मुख्य खात्याने रक्कम खर्च करू नये, निविदा काढू नये, तसेच मुख्य खात्याने केलेल्या कामांवर पुन्हा वॉर्ड ऑफिस, उपआयुक्त व त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांनी निविदा काढू नयेत अशा तरतूदी आहेत. तथापी क्षेत्रिय कार्यालाने केलेल्या कामांवर पून्हा मुख्य खात्याकडून कामे करण्याबाबत निविदा काढल्या जात असून, लाखाचे बारा हजार या म्हणीप्रमाणे पुणे महापालिकेतच्या विद्युत ...
पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या का…? आयुक्त व अति. आयुक्तांच्या बदली आदेशाला, आरोग्य निरीक्षकांसह क्षेत्रिय अधिकारी व उपआयुक्तांनी दाखविला कचऱ्याचा डंपर

पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या का…? आयुक्त व अति. आयुक्तांच्या बदली आदेशाला, आरोग्य निरीक्षकांसह क्षेत्रिय अधिकारी व उपआयुक्तांनी दाखविला कचऱ्याचा डंपर

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत मागील 10 ते 12 वर्षांपासून आरोग्य निरीक्षकांच्या बहुचर्चित बदल्यांचे आदेश 14 ऑगस्ट रोजी अति. आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी जारी केले. 15 ऑगस्ट व पुढे गणेशोत्सव असल्यामुळे, गणेश विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करून दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष बदली विभागात रूजु होण्याचे आदेश देवून, यासाठी स्वतंत्र कार्यमुक्ती आदेशाची (रिलिव्ह मेमो) ची आवश्यता नाही असेही आदेशात नमूद केले होते. तथापी कार्यमुक्त करण्यात येवून आज 10 दिवस झाले तरी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक बदलीच्या ठिकाणी रूजु झाले नाहीत. तसेच काही रुजु झाले तरी त्यांना आरोग्य कोठ्या देण्यात आलेल्या नाहीत. सर्व आरोग्य निरीक्षक यांना सांगण्यात येत आहे की, दोन दिवस थां...
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षकांच्या बदलीची महानौटंकी, पुणेरी प्रशासन अतिरिक्त आयुक्तांनाही मुळा-मुठेच्या संगमाचे तीर्थ पाजणार…

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षकांच्या बदलीची महानौटंकी, पुणेरी प्रशासन अतिरिक्त आयुक्तांनाही मुळा-मुठेच्या संगमाचे तीर्थ पाजणार…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या मागील 10 ते 12 वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक आरोग्य निरीक्षक स्वतःला त्या त्या भागाचा मालक किंवा सरसेनापती म्हणवून घेवू लागले होते. व्यावसायिक आणि आरोग्य निरीक्षकांचे एवढे सूत जुळले आहे की, प्रत्येक आरोग्य निरीक्षक म्हणेल ती पूर्वदिशा ठरू लागली होती. या अहंकारामुळे पुणे शहरात कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान अरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांबाबत नॅशनल फोरम वृत्तपत्रासह रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी तक्रार केल्यानंतर पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात बदल्यांचे कागद फिरू लागले. उदया 31 जुलै रोजी पुणे महापालिकेच्या जुन्या जी.बी. हॉलमध्ये समुपदेशनाने बदल्या करण्याचे फर्मान अतिरिक्त आयुक्तांच्या साक्षीने सामान्य प्रशासन...
PMC- पुणे महापालिकेतील ठेकेदारकृत वेठबिगारी, घाणीत हात घालून करावे लागतेय काम

PMC- पुणे महापालिकेतील ठेकेदारकृत वेठबिगारी, घाणीत हात घालून करावे लागतेय काम

शासन यंत्रणा, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाणडोक्यावरून मैला वाहून नेण्याची विखारी पद्धत भारतात अनेक वर्षांपासून सुरू होती. आर्थिकदृष्ट्या गरीब आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या (अनु. जातीचे) लोकांकडून ही कामे करवुन घेतली जात होती. मुघल, ब्रिटीश भारतासह स्वातंत्र्यानंतरही ही पद्धत सुरू होती. दरम्यान 1976 साली वेठबिगारी अधिनियम पारीत करण्यात आला असला तरी ब्रिटीश भारतात 1942 साली व स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानात ही पद्धत बंद करण्यात आली. डोक्यावरून मैला वाहून नेण्याविरूद्ध प्रतिबंध करण्यात आला. आज पुणे महापालिकेत ठेकेदारांकडून बालकामगारांकडून झाडणकामे करवून घेतली जात आहेत, तसेच आर्थिक व सामाजिकदृष्टया मागासलेल्या समाजातील कंत्राटी कामगारांनाकडून स्वच्छता विषयक कामे करवुन घेत असतांना त्यांना कायदयातील व टेंडरमधील तरतुदीनुसार हॅन्डग्लोज, गमबुट व मास्क दिले जात नाहीत. त्यामुळे या कंत्राटी कामगारांना...
सिंहगड क्षेत्रिय कार्यालय हद्दीत जाईन तिथे कचराच कचरा, तरीही यु.आर. फॅसिलिटी या ठेकेदाराची कोट्यवधी रुपयांची बीले मंजुर होतात तरी कशी…?

सिंहगड क्षेत्रिय कार्यालय हद्दीत जाईन तिथे कचराच कचरा, तरीही यु.आर. फॅसिलिटी या ठेकेदाराची कोट्यवधी रुपयांची बीले मंजुर होतात तरी कशी…?

शासन यंत्रणा, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ Aniruddha Shalan Chavan/पुणे महापालिकेचे पैसे झाडाला लागल्यासारखे, ठेकेदारांची कोट्यवधी रूपयांची बीले मंजुर केली जात आहेत. परंतु ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यासह कायम बिगारी सेवक हजर आहेत की नाही याची पाहणी करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, तेच काही मोकादम, काही एसआय बोगस हजेऱ्या लिहून पुणे महापालिकेची फसवणूक करीत आहेत. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या व पुणे महापालिका घनकचरा विभागाच्या महापालिका सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार- पवार ह्या आज दि. 23 जुलै 2025 रोजी आरोग्य कोठीवर येवून निव्वळ हजेरी रजिस्टरची पाहणी केली आहे. त्यांनी मागे देखील इतर आरोग्य कोठ्यांतील हजेरी रजिस्टरची पाहणी केली, परंतु हद्दीत फिरून, हद्द स्वच्छ आहे की नाही याची पाहणी केली नाही. निव्वळ आरोग्य कोठ्यांवर हजेरी रजिस्टर पाहून पुणे शहर स्वच्छ होणार नाही, तर हद्दीत पाहणी करून दोषी असलेल्यांवर कारवाई केल्याखेरीज क...