पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या का…? आयुक्त व अति. आयुक्तांच्या बदली आदेशाला, आरोग्य निरीक्षकांसह क्षेत्रिय अधिकारी व उपआयुक्तांनी दाखविला कचऱ्याचा डंपर
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत मागील 10 ते 12 वर्षांपासून आरोग्य निरीक्षकांच्या बहुचर्चित बदल्यांचे आदेश 14 ऑगस्ट रोजी अति. आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी जारी केले. 15 ऑगस्ट व पुढे गणेशोत्सव असल्यामुळे, गणेश विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करून दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष बदली विभागात रूजु होण्याचे आदेश देवून, यासाठी स्वतंत्र कार्यमुक्ती आदेशाची (रिलिव्ह मेमो) ची आवश्यता नाही असेही आदेशात नमूद केले होते. तथापी कार्यमुक्त करण्यात येवून आज 10 दिवस झाले तरी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक बदलीच्या ठिकाणी रूजु झाले नाहीत. तसेच काही रुजु झाले तरी त्यांना आरोग्य कोठ्या देण्यात आलेल्या नाहीत. सर्व आरोग्य निरीक्षक यांना सांगण्यात येत आहे की, दोन दिवस थां...









