Tuesday, February 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: punecrime

खोटी बनावट पेमेन्ट स्लिप व्दारे न्यायालयाची फसवणुक करणाऱ्या आरोपीस शिवाजीनगर पोलीसांनी केले गजाआड

खोटी बनावट पेमेन्ट स्लिप व्दारे न्यायालयाची फसवणुक करणाऱ्या आरोपीस शिवाजीनगर पोलीसांनी केले गजाआड

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर येथे जामीनासाठी खोटे सात बारा उतारे, बनावट प्रॉपर्टी कागदपत्रे आता तर बनावट पगार पावती देणाराला शिवाजीनगर पोलीसांनी गजाआड केले आहे. न्यायालयात एखादा कागद सादर केल्यानंतर, तो खरा आहे की खोटा आहे, हे तपासण्याचे काम महसुल विभागाकडे आहे. न्यायालय केवळ सर्टीफाईड म्हणजे खरी नक्कल प्रत देण्याचे काम करते, परंतु ते खरे की खोटे हे तपासण्यासाठी कोर्टाकडे तशी यंत्रण उपलब्ध नसल्यामुळे वर्षानुवर्षे कोर्टात बनावट कागदपत्रे देवून, न्यायालयाची फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी सातत्याने अशा प्रकारांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला तरी, नव नवीन प्रकरणे समोर येत आहेत. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे श्री. अरविंद ललित सोमाणी, (रा- खडकवासला, पुणे ) यांनी फिर्याद दिली की, आ...
ब्रेकअप केल्याचा रागातून ऊस गुऱ्हाळातील हत्याराने मित्रावर वार, धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील थरारक घटना

ब्रेकअप केल्याचा रागातून ऊस गुऱ्हाळातील हत्याराने मित्रावर वार, धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील थरारक घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील ऊसाच्या गुऱ्हाळातील, ऊस तोडण्याच्या हत्याराने आरोपीवर वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा थरारक प्रकार घडला आहे. 2 फेब्रुवारी रोजी फिर्यादी व आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय 24 वर्षे रा. समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे असे संजीवनी बार त्रिमुर्ती चौक, येथे बोलत बसले होते. फिर्यादी यांनी आरोपीस त्याच्या मैत्रिणीपासून ब्रेकअप घडवून, त्यांच्यात भांडण लावून, त्याने कॉल केल्याच्या रागातून आरोपी चेतन चव्हाण याने बाजूच्या ऊसाच्या रसवंती गृहातील ऊस तोडण्याचे हत्यार घेवुन आज तुला जिवंत सोडणार नाही.... असे म्हणून त्या कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हातावर, डोक्यावर, डाव्या पायाचे नडगीस व कानास हत्याराने वार करुन गंभीर जखमी करून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी विरूद्ध भारती विदयापीठ स्...
पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर स्वारगेट पोलीसांची कारवाई

पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर स्वारगेट पोलीसांची कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील स्वारगेट जवळील लक्ष्मीनारायण चौकात एलडिनेरो या हॉटेलमध्ये तंबाखुयुक्त हुक्का पार्लर सुरू असल्याची तक्रार, स्वारगेट पोलीस स्टेशन यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाल्यानंतर, स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी तातडीने बेकायदेशिर हुक्का पार्लरवर कारवाई करून सुमारे 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच हॉटेलच्या वेटरसह मालक, चालक यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,स्वारगेट पोलीस स्टेशन यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून खबर मिळाली की, लक्ष्मीनाराण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डीग मधील एलडिनेरो हॉटेल मध्ये अवैधरित्या हुक्का चालु असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले. त्यानुसार स्वारगेट पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक विकास भारमळ, मपोउपनि सुजाता जाधव, तपास पथकातील पोलीस अंमलदार पोअंमलदार टोणपे, पोअंम कुडाळकर, चालक पोअंम ठोंबरे, मार्शल...
पुणे शहर पोलीसांकडील आजच्या गुन्ह्यांचा वृत्तांत

पुणे शहर पोलीसांकडील आजच्या गुन्ह्यांचा वृत्तांत

पोलीस क्राइम
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन 2. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन 3.पर्वती पोलीस स्टेशन 4.विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व 5. येरवडा पोलीस स्टेशन नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मोबा-9890452092/पुणे शहर वाहतुक पोलीस आता क्वचितच रस्त्यावर दिसून येतात. वाहतुक पोलीसांचा एक वेळ ठरलेली असते, तेवढ्या वेळेत दंडाचा कोटा पूर्ण केला की, नंतर वाहतुक पोलीस कुठेही दिसत नाहीत अशी आज पुणे शहरातील परिस्थिती आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने अतिशय बेदरकारपणे चालविली जावून त्यात नागरीकांचा जीव जात आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतही बेदरकार वाहन चालविल्यामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नागरीचा मृत्यू झाला आहे. लोणीकाळभोर व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत बेदरकार वाहनांमुळे नागरीकांचा मृत्यू लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील काळभोरवाडा, थेऊर फाटयाजवळ, एक 35 वर्षीय इसमास कुणीतरी अज्ञात...
डावा हात मनगटापासून तोडणाऱ्या विधीसंघर्षित फरार बालकास गुन्हे युनिट 1 ने केले शिताफीने जेरबंद,

डावा हात मनगटापासून तोडणाऱ्या विधीसंघर्षित फरार बालकास गुन्हे युनिट 1 ने केले शिताफीने जेरबंद,

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 22जुलै 2024 रोजी मोदी पेट्रोलपंप जवळ, मंगळवार पेठ, पुणे येथून फिर्यादी हे रोडने जात असताना पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून 08 ते 09 इसमांनी मिळून धारधार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये फिर्यादी यांचा डावा हात मनगटापासून वेगळा झाला होता. ह्या गुन्ह्याची नोंद फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.149/2024. भा. न्या.सं. कलम 109, 189(2), 189 (4), 191 (2). 191 (3). 190. 126 (2), 352.351 (3),115(2), आर्म ॲक्ट कलम 3(25) 4(25) महा पो कायदा कलम 37 (1) (3) सह 135 क्रिमीनल लॉ ॲमेंडमेंट ॲक्ट कलम 7 महा संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1) 3 (2), 3 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान यापुर्वी सदर गुन्ह्यात एकुण 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. विधीसंघर्षित बालक एक वर्षापासून फरार होता. दरम्य...
मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/देवा उर्फ देविदास पालते वय 25 वर्ष मूळ राहणार नांदेड जिल्हा सध्या रा. धायरी याने दुसऱ्याचा मोबाईल फोन त्याला न विचारता घेतल्याने, या तरुणास जबरी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील धायरी येथे घडली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, स.नं. 30/13, साई धाम, त्रिनेश इंजिनिअरींग कंपनीचे वर पहीला मजला प्रभात प्रेस रोड, धायरी पुणे येथे एक इसम हा जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर यांनी लागलीच घटनास्थळी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी इसम नामे देवा उर्फ देविदास पालते (वय 25 वर्षे ) रा.मु.पो.तागयाल पो. कलबर देवाची ता. मुखेड जि. नांदेड (सध्या स.नं. 30/13, साई धाम, जिनेश इंजिनिअरींग कं...
तडीपार आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वावर, गुन्हे युनिट 3 ने कारवाई करीत तडीपारास केले जेरबंद

तडीपार आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वावर, गुन्हे युनिट 3 ने कारवाई करीत तडीपारास केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात तडीपार आरोपींचा वावर असल्याचे पुन्हा समोर आले आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपी त्याच्या पत्नीस सिंहगड रोड येथे कामावर सोडण्यासाठी येत असतो अशी माहिती मिळाल्याने गुन्हे युनिट 3 कडील पथकाने त्याचा अचुक शोध घेवून त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. पो स्टे हददीमध्ये गंभीर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणून अभिलेखावरील तडीपार, मोक्का, पाहीजे आरोपी यांचा शोध घेवून कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी मुफजल आदेश दिल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणेकामी गुन्हे शाखा युनिट 3 मधील सपोफौ शिंदे, पो हवा कैलास लिम्हण, पो हवा अमोल काटकर, पो हवा किशोर शिंदे, पो.शि योगेश झेंडे, पो.शि तुषार किंद्रे असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पो हवा कैलास लिम्हण व पो शि किंद्रे यांना सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तडीपार आरोपी नामे गणेश दिल...