
पुणे शहरात दरोडा, लुटालुट आणि फसवणूकीचा कहर झाला!
पुणे शहरातील पोलीस सध्या कुठे आहेत…. रस्त्यावर नाहीत, चौकातही दिसत नाहीत, पोलीस चौक्या ओस पडल्या आहेत, पोलीस स्टेशमध्ये देखील वावर नाही… मग सध्या पुण्यातील 10/12 हजार पोलीस गेलेत तरी कुठे….आलं मनांला… गेले शेणाला… टाकल टोपलं… अन् बसले उन्हाला….
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-देशात कुण्याकाळी सांगण्यात आले होते की, नोटबंदी केल्यानंतर दहशतवाद थांबेल, गुन्हेगारी थांबेल आणि ड्रग तस्करी थांबेल. परंतु त्याच्या उलटेच देशात घडत आहे. नोटबंदीनंतर ना दहशतवाद थांबला ना.. ड्रग तस्करी थांबली. पुण्यातही मागील काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सर्व गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. त्यात सर्वांना म्हणे तंबी दिली. गुन्हेगारी कुणी केली तर त्याची गय केली जाणार नाही अशा आणाभाका करण्यात आल्या. परंतु पुणे शहरातील गुन्हेगारी तरी संपली नाही, उलट ती अधिक वेगाने वाढत गेली आहे. झोपडपट्टीपासून चौकाचौकाती...