Saturday, January 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Pune Municipal Corporation

पुणे महापालिकेत पैसा जिंकत आहे, मनपा कर्मचारी हारत आहेत… पुणे महापालिकेतील ॲडव्होकेट पॅनेल, सहा. विधी अधिकारी पदांच्या भरतीतही आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचा हस्तक्षेप, आयुक्तांजवळच्या उमेदवारांचा अधिक भरणा केल्याचा होत आहे आरोप

पुणे महापालिकेत पैसा जिंकत आहे, मनपा कर्मचारी हारत आहेत… पुणे महापालिकेतील ॲडव्होकेट पॅनेल, सहा. विधी अधिकारी पदांच्या भरतीतही आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचा हस्तक्षेप, आयुक्तांजवळच्या उमेदवारांचा अधिक भरणा केल्याचा होत आहे आरोप

सर्व साधारण
अभियंता भरतीमध्ये बोगस दाखले देणाऱ्यांवर अद्याप पर्यंत फौजदारी कारवाई का झाला नाही… की पैसा बोलता है…नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून नोकर भरती वेगात सुरू आहे. नोकर भरती आणि पदोन्नतीच्या बहुतांश प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांच्याकडून स्वतःहून निर्णय घेतले जात आहेत, काही प्रकरणे मुद्दामपणे शासनाच्या अभिप्रायार्थ पाठवुन 15/20 वर्ष कार्यरत सेवकांना मात्र पदोन्नती दिली जात नाहीये. महापालिकेच्या बहुतांश, सहायक मनपा आयुक्त पदावर केवळ प्रतिनियुक्तीने आलेल्या शासकीय सेवकांना संधी देण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतीमधुन आलेल्या नवख्या सेवकांना देखील सहायक महापालिका आयुक्त पदावर नियुक्त केले जात आहे. थोडक्यात पुणे महापालिकेतील संपूर्ण 80 खात्यांतील वर्ग 1 ते 4 मधील कर्मचारी त्रस्त झालेले आहेत, हैराण झालेले आहेत. आज पुणे महापालिकेत पैसा जिंक...
पुणे महापालिकेतील बदली,पदोन्नती आणि टेंडर राज मधील भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी, आयुक्त विक्रम कुमार वा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची सीबीआय व ईडीमार्फत चौकशीची मागणी

पुणे महापालिकेतील बदली,पदोन्नती आणि टेंडर राज मधील भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी, आयुक्त विक्रम कुमार वा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची सीबीआय व ईडीमार्फत चौकशीची मागणी

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. अरविंद शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेतील बदली, पदोन्नतीतील पदस्थापनेसाठी वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंत सुमारे 10 लाख, 20 लाख, व 30 लाख अशा रकमा घेतल्याखेरीज बदली आणि पदोन्नतीतील पदस्थापना दिली नसल्याचा तक्रार अर्ज राज्याच्या नगरविकास मंत्रालयांना पाठवून तो अर्ज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. अरविंद शिंदे यांच्या खळबळजनक आरोपानंतर, पुणे महापालिकेत सार्वत्रिक बदल्यांचे सत्र सुरू झाले. 15 हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ 900 सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान सार्वत्रिक बदल्यांच्या अवघ्या चारच महिन्यात सामान्य प्रशासन मधील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची पुनः आहे त्याच खात्यात मागच्या दाराने नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतःच्या खात्याचे कामकाज पाहून अतिरिक्त पदभार दिल्याचे 26 जुन रोजीच्या का...
पुणे महापालिकेत भ्रष्ट उप कामगार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे कटकारस्थान

पुणे महापालिकेत भ्रष्ट उप कामगार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे कटकारस्थान

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील सुमारे 10 हजार कंत्राटी कामगारांना शासन नियमानुसार किमान वेतन न देणे, खाजगी सुरक्षा रक्षक आणि झाडण काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सुरक्षा प्रावरणे न देणे, ईपीएफ व ईएसआय ठेकेदाराने भरलेला नसताना देखील संबंधित ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले धडाधड मंजूर करणे या सर्व गंभीर प्रश्नाच्या न्याय हक्कासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुणे महानगरपालिकेतील कामगार संघटनांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी तीव्र धरणे आंदोलन केलेली आहेत. आज त्याच भ्रष्ट प्रभारी उप कामगार अधिकाऱ्यांना मागील दाराने पदोन्नती देण्याची कारस्थाने सुरू असल्याचे ऐकिवात येत आहेत. मुख्य कामगार अधिकारी असलेले शिवाजी दौंडकर आता सेवानिवृत्त झाले आहेत. तथापि त्यांच्या कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असलेल्या दहा हजार कंत्राटी का...
पुणे महानगरपालिकेत मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षित पदांवर खुल्या गटातील उमेदवारांची नियुक्ती, पुणे महापालिकेत 2018 पासून रोस्टर तपासून घेतलेच नाही

पुणे महानगरपालिकेत मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षित पदांवर खुल्या गटातील उमेदवारांची नियुक्ती, पुणे महापालिकेत 2018 पासून रोस्टर तपासून घेतलेच नाही

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षित पदांवर खुलेआमपणे खुल्या संवर्गातील सेवकांच्या धडाधड नियुक्त्या केल्या जात असल्याची बाब दिसून आलेली आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेने 2018 पासून आज 2023 या कालावधीत सर्व पदांचे रोस्टर विभागीय आयुक्त कार्यालय मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे आवश्यक असतांना देखील ते तपासून घेण्यात आली नसल्याची बाबही समोर आली आहे. दरम्यान शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी दरवर्षी मागासवर्गीयांना देण्यात येणारी पदोन्नती व पदस्थापनेमध्ये रोस्टर व बिंदू नामावली प्रमाणे तपासणी व नियुक्त्या करण्याचा शासन निर्णय असताना देखील पुणे महानगरपालिकेने 2018 पासून रोस्टर तपासणी केली नसल्याने जाणीवपूर्वक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग (अबकड), विशेष मागास प्रवर्ग यांच्या आरक्षित असलेल्या पदोन्नतीच्या जागांवर खुल्या स...
पुणे महापालिकेची लाखकोटीची बदनामी करणाऱ्या त्या 8 प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी मूळ खात्यात पदभार स्वीकारला नाही

पुणे महापालिकेची लाखकोटीची बदनामी करणाऱ्या त्या 8 प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी मूळ खात्यात पदभार स्वीकारला नाही

शासन यंत्रणा
आयुक्त, अति. आयुक्त कारवाई करण्यापासून त्यांना संरक्षण कशासाठी …पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महापालिकेतील10 हजार कंत्राटी कामगार व खाजगी सुरक्षा रक्षकांचे किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय, कंत्राटी कामगार यांना सुरक्षा प्रावरणे, साहित्य आदि सर्वांमध्ये महाघोटाळा केल्यामुळे मागील सहा वर्षात पुणे महापालिकेवर शेकडोंनी आंदोलने झाली. यामुळे संपूर्ण राज्यात पुणे महापालिकेची नाहक बदनामी झाली. अ वर्ग असलेल्या महापालिकेची मान शरमेने खाली गेली. त्यात मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी दौंडकर, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांच्यासह 1. अमित अरविंद चव्हा, 2. आदर्श गुरूपाद गायकवाड, 3. प्रविण वसंत गायकवाड 4. माधवी सोपान ताठे 5. लोकेश लोहोट, 6. चंद्रलेखा गडाळे 7. सुरेश दिघे 8. बुगप्पा किस्टप्पा कोळी या आठ कर्मचाऱ्यांनी महापालिकेची नाहक बदनामी केली आहे. संविधान परिषदेसह अन्य संघटनांनी आंदोलन केल्...
कंत्राटी कामगारांसाठी शेकडो आंदोलनानंतर पुणे महापालिकेचा कामगार कल्याण विभाग जागा झाला, आठ वर्षानंतर ई पेहचानपत्राचे वाटप

कंत्राटी कामगारांसाठी शेकडो आंदोलनानंतर पुणे महापालिकेचा कामगार कल्याण विभाग जागा झाला, आठ वर्षानंतर ई पेहचानपत्राचे वाटप

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेसाठी 10 हजार कंत्राटी कामगार कष्ट उपसत आहेत. परंतु 2006 ते आज 2023 या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांना साधे ओळखपत्रही दिले गेले नाही. किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय ची सुविधा देखील दिली नाही. यामुळे पुणे महापालिकेवर विविध राजकीय पक्ष व संघटनांनी कित्येक महिने आंदोलने केली. आज आठ वर्षानंतर पुणे महापालिकेला जाग आली असून, त्यांनी कंत्राटी कामगारांना ई पेहेचान पत्राचे वाटप करण्यात आले आहे. पुणे महापालिकेत सुमारे 10 हजार कंत्राटी कामगार असतांना केवळ 37 जणांना या ओळखपत्राचे वाटप केले आहे. परंतु वाटपाचा मात्र मोठा गाजावाजा केला जात आहे. मुख्य कामगार अधिकाऱ्यांना 8 वर्षानंतर जाग -पुणे महापालिकेने 2006 ते 2023 या आठ वर्षाच्या कालावधीत कंत्राटी कामगारांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांना सुरक्षा उपकरणे प्रावरणे देखील देण्यात आली नाहीत. साधा युनिफॉर्म देखील दिला ना...
पुणे महापालिकेच्या तिजोरीवर विधी खात्याचा दरोडा<br>न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यानंतर देखील अपील विहीत वेळेत न केल्यामुळे बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे महापालिकेच्या तिजोरीवर विधी खात्याचा दरोडा
न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यानंतर देखील अपील विहीत वेळेत न केल्यामुळे बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविण्याचा न्यायालयाचा आदेश

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महापालिकेच्या विधी खात्यातील 5 हजार कोर्ट केसेस, 20 ते 25 हजार कोटींच्या मालमत्तेच्या वसुलीची प्रकरणे, (यात मोबाईल टॉवर 10 हजार कोटीची केस, पर्वती येथील 1 हजार कोटी रुपयांची केस, पुनावाला गार्डन या सारख्या अनेक कोर्ट केसेस), ॲडव्होकेट पॅनलची निवड, मनमानी वकीलांची निवड (ॲड.लिना कारंडे,ॲड. रोहन सराफ) काही विशिष्ठ वकीलांना 200/ 300 कोर्ट(उदा- ॲड. ज्ञानदेव चौधरी यांना 200/300 कोर्ट कसेसे) , काही वकीलांना 30/40 कोर्ट केसेस( काही ज्येष्ठ वकीलांकडून त्याही कोर्ट केसेस काढुन घेतल्या), बांधकाम, टॅक्स विभागातील कोर्ट प्रकरणे काही विशिष्ठ वकीलांना देणे(ॲड.ज्ञानदेव चौधरी,ॲड. संजय मुरकुटे), उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील वकीलांची निवड व त्यांच्या फी बाबत धोरण निश्चित न करणे, बदली अधिनियमाला हरताळ फासत 10 ते 15 वर्षांपासून विशिष्ठ कर्मचाऱ्यांचा विधी खात्यात घरोबा(उदा-गोहर...
पुणे महापालिकेत गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणाऱ्या शिवाजी दौंडकरांची एसीबी चौकशी कुणी थांबविली….

पुणे महापालिकेत गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणाऱ्या शिवाजी दौंडकरांची एसीबी चौकशी कुणी थांबविली….

सर्व साधारण
गृहमंत्रालयाच्या यादीनुसार पुणे मनपातील 31 भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत आयुक्त गंभिर नसल्याचे टिपणपुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांच्या रेकॉर्डवरील आरोपी इसम नामे शिवाजी भिकाजी दौंडकर, सोमनाथ हरिभाऊ बनकर व राकेश यल्लप्पा विटकर यांच्या विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल नियम 79 च्या नियम 8 येथील तरतुदी विचारात घेवून महाराष्ट्र महापालिका अधिनियम 56 व सेवाविनियमन 56 अन्वये चौकशी करण्यात येत असून श्री. धनाजी भ. पाटील, उपसंचालक लेखा विभाग (सेवानिवृत्त) यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तसेच जगन्नाथ पवार प्रकल्प संचालक (सेवानिवृत्त) तथा चौकशी अधिकारी पुणे मनपा यांना कळविण्यात आले होते. तथापी शिवाजी दौंडकर यांच्या सेवानिवृत्तीस अवघे दोन महिने शिल्लक असतांना देखील त्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्ट...
पुणे महापालिकेचे ॲडव्होकेट पॅनल निवडीची नौटंकी,<br>वकील पॅनल निवड प्रक्रियेद्वारा निशा चव्हाण यांच्याकडून पुणे महानगरपालिका व वकिलांची फसवणूक

पुणे महापालिकेचे ॲडव्होकेट पॅनल निवडीची नौटंकी,
वकील पॅनल निवड प्रक्रियेद्वारा निशा चव्हाण यांच्याकडून पुणे महानगरपालिका व वकिलांची फसवणूक

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मोबाईल टॉवरची 10 हजार कोटी रुपये मालमत्तेची वसुली, पर्वती येथील एक हजार कोटी रुपयांची जमीन, गुलटेकडी येथील 100 कोटी रुपये किमतीची जमीन यासह मिळकत कर विभागाची सुमारे दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे दावे प्रलंबित असून टीडीआर, एफएसआय अभिप्राय बाबतची प्रकरणे, ॲडव्होकेट पॅनल यासह पुणे महानगरपालिकेच्या मुख्य विधी अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर सुमारे 100 दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाचा एक प्रमुखभाग ॲडव्होकेट पॅनलच्या नियुक्तीचा होता. फेबु्रवारी 2023 रोजी ॲडव्होकेट पॅनलची जाहीरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. नवीन ॲडव्होकेट पॅनलच्या नियुक्तीच्या नाटकाचा प्रारंभ झाला असून, यामध्ये काही विशिष्ठ वकीलांची निवड होण्याच्या दृष्टीकोनातून जाहीरातीमध्ये अटी व शर्तींचा अंतर्भाव कर...
पुणे महापालिकेच्या विधी विभाग भरती प्रक्रियेत आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचा हस्तक्षेप…? जवळच्या नातेवाईकांची सहा. विधी अधिकारी पदावर वर्णी…?

पुणे महापालिकेच्या विधी विभाग भरती प्रक्रियेत आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचा हस्तक्षेप…? जवळच्या नातेवाईकांची सहा. विधी अधिकारी पदावर वर्णी…?

सर्व साधारण
pmcjlapune मनपा मुख्य कार्यालात मुख्य विधी अधिकाऱ्याचा वाढदिवस धुमडक्याज साजरा पुणे/दि/ नॅशनल फोरम/महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि पुणे महापालिका सेवाशर्ती नियमानुसार पुणे महापालिकेतील कोणत्याही नोकरभरतीमध्ये आयुक्तांनी पदनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यासह खातेप्रमुख, मुख्य लेखापरीक्षक यांच्या कर्मचारी निवड समितीमार्फतच कामकाजाचे नियम आहेत. तथापी पुणे महापालिकेतील सहायक विधी अधिकारी या पदाच्या भरतीप्रक्रियेमध्ये महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अतिजवळच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असल्याची बाब पुणे महापालिकेत चर्चिली जात आहे. यात अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे, उपआयुक्त साप्रवि श्री. सचिन इथापे व खातेप्रमुख श्रीमती निशा चव्हाण यांच्यावर दबाव आणून, पात्रता नसतांना देखील उमेदवाराची निवड केली असल्याची गंभिर चर्चा सध्या पुणे महापालिकेत होत आहे. त्यामुळे सहायक विधी अधिकारी पदाची ...