Thursday, November 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pmcpune

राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारी व्यावसायिकांचा बिमोड करून, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाची धडक अतिक्रमण कारवाई, वाहतुक कोंडीतून नागरीकांची सुटका

राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारी व्यावसायिकांचा बिमोड करून, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाची धडक अतिक्रमण कारवाई, वाहतुक कोंडीतून नागरीकांची सुटका

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गणपती माथा ते शिंदे पूल हा एनडीए कडे जाणारा रस्ता कायमच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या वाहनांनी गजबजलेला असतो. नागरिकांना रस्त्यावरून जाताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. दरम्यान गेली अनेक वर्ष नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रारी येत होत्या, परंतु काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यवसायिक व राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणी कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यावसायिकांचा बिमोड करून अतिक्रमण विभाग व मध्यवर्ती पथकाकडून धाडसी कारववाई आज करण्यात आली. कारवाई करत असीतारंना, वाहनांची पळापळ, कर्मचाऱ्यांच्या अंगावरही धावुन आले-या कारवाईत 16 व्यावसायिक टेम्पो, 06 बिगर टप हातगाडी, 1 टप हात गाडी, 3 नग होजिअरी, 3 लोखंडी काउंटर, 3 गॅस सिलेंडर, 1 फ्रीज, 1 लोखंडी बाक...
धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाकडून तळजाई वसाहत येथे मतदार जागृती अभियान

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाकडून तळजाई वसाहत येथे मतदार जागृती अभियान

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने परिमंडळातील क्रमांक 3 मधील पर्वती विधानसभा मतदारसंघातील तळजाई वसाहती मधील गल्ल्या मधून मतदान जनजागृती करण्यात आली. धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक समाज विकास अधिकारी संदीप कोळपे, समूह संघटिका सोनाली जगताप, ललिता सूर्यवंशी, सीमा सोनार, वर्षा मांढरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस,अतिक्रमण निरीक्षक श्री अमोल लावंड यांच्या उपस्थितीत तळजाई वसाहत येथील परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये जनजागृती करणे, नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी विशेष मोहीम अंतर्गत खडकवासला मतदार संघामध्ये नागरिकांना सविस्तर माहिती दिली. एकूण 73 महिला व 11 पुरुष एकूण मतदार 84 उपस्थित होते. नागरिकांनी मतदान जनजागृती मध्ये उत्स्फ...
वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनाधिकृत फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनाधिकृत फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील मुंबई बेंगलोर महामार्गावर गेले अनेक दिवस नागरिकांना पथारी व्यावसायिकांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. परंतु संबंधित व्यवसाय धारक हे खाजगी जागेत असल्याचे भासऊन अनधिकृतरित्या महामार्गावर व्यवसाय करीत असल्याचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांनी निदर्शनास आणून दिल्याने त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत साधारण 06 बिगर टप हातगाडी, 1 लोखंडी काउंटर, 14 मोठे टायर, 2 टेंथ, 1 वजन काटा, 6 कॅरेट फळ पथारी, 1 गॉगल स्टॅन्ड, 25 टेडी, 20 चादरी, 5 गाद्या व 40 रजया जप्त करण्यात आल्या व 5 कच्चे शेड पाडून टाकण्यात आले. सदर ठिकाणी व्यावसायिकांनी कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात विरोध केला, परंतु विरोधाला न जुमानता ही करावाई चालू ठेवली. वा...
पुण्यात गणेशोत्सवाची धामधुम- महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची लुटालुट- टेंडरसाठी ठेकेदारांची दण्णादण्णी

पुण्यात गणेशोत्सवाची धामधुम- महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची लुटालुट- टेंडरसाठी ठेकेदारांची दण्णादण्णी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. घरोघरचे गणपती बसविण्यासाठी बच्चे कंपनीसह कुटूंबातील सर्व सदस्य झाडुन कामाला लागले आहेत. सार्वजनिक मंडळातील कार्यकर्ते देखील झटून काम करीत आहेत. कुणालाही मान वर करून पाहण्यासाठी वेळ नाही अशी पुण्यातील परिस्थिती असतांना, दुसरीकडे मात्र पुणे महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात टेंडर कामावरून रणकंदन पेटले आहे. गणपती बसण्याच्या आधीच गणपती विसर्जनासाठी टेंडर काढण्याची लगबग सुरू आहे. फिरते वाहन, शाळा, मोकळ्या जागेतील विसर्जन हौद, त्यावरील विद्युत सुविधा याचे टेंडर मिळावे म्हणून ठेकेदारांची पळापळ सुरू आहे. आज शनिवार आहे. क्षेत्रिय कार्यालयात नागरीकांना येण्यास सुट्टी असली तरी अधिकारी व ठेकेदार हजर आहेत. कोणते टेंडर कुणाला दयावे यासाठी बैठका झडत असतांना, काही ठेकेदार तर हमरीतुमरीवर आले असल्याचे पाहण...
PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सार्वत्रिक बदली आणि पदोन्नतीचे सनई चौघडा वाजत असतात. यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत बदली आणि पदोन्नतीचा सनई चौघडा वाजला. तसं म्हणायला गेल्यास सेवकांच्या पसंती क्रमानुसार व समुपदेशाने बदली केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात काही क्रिमी खात्यात वर्णी लागावी, म्हणून अनेकांनी माननीयांचे पाय अजून सोडलेले नाहीत. बदल्यांचे आदेश निघाले आहेत, परंतु क्रिमी खात्यातील काही सेवक खुर्ची सोडायला तयार नाहीत. हवं तर पाच लाखावरून दहा लाखाचा टोल घ्या पण मला इथेच राहू द्या, अशी गळ माननीय घातली जात आहे. नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्यावाणी मला वागवा, रात धुंदीत ही जागवा, असं सर्वत्र सुरू आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदावर माधव ज...
महापालिका, शासकीय सेवेतील मागासवर्गियांचे पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाचा अडसर?

महापालिका, शासकीय सेवेतील मागासवर्गियांचे पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाचा अडसर?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणमहाराष्ट्र शासनाने वर्ग चार मधील शासकीय नोकरभरती बंद करून त्या जागा खाजगी ठेकेदारामार्फत भरल्या जात आहेत. वर्ग 3 मधील पदे देखील खाजगी ठेकेदार व कंपनीमार्फत भरण्याचे शासन निर्णय जारी केले आहेत. दरम्यान शासकीय सेवेतील एससी,एसटी,व्हीजेएनटी कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण देखील 7 मे 2021 च्या शासन निर्णयाने संपविले. आता तर जातीमधील वर्गीकरणाच्या नावाखाली संपूर्ण मागासवर्गीयांना शासकीय सेवेतून अस्पृश्य ठरविण्याचा घाट घातला गेला आहे. शासनामध्ये आधीच मागासवर्गीयांचा अनुशेष शिल्लक असतांना, पुन्हा जातीमधील वर्गीकरणाच्या नावाखाली पदे रिक्त ठेवण्यात येवून, पुढे जावून हीच पदे खुल्या गटातून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन होत असतांना देखील राज्यातील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी (शरद पगार गट+ अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे गट + शिंदे ...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना, अधिकारी होऊ दयायचे नाही?

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना, अधिकारी होऊ दयायचे नाही?

सर्व साधारण
प्रशासकीय सेवेतील 15 महापालिका सहाय्यक आयुक्त पदांवर शासन किंवा तांत्रिक सेवकांची नियुक्ती,नियमांवर बोट ठेवून, प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना वॉर्ड ऑफिसर पदांपासून वंचित ठेवले नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-पुणे महापालिकेतील प्रशासकीय सेवांतर्गत सध्या खेकड्यांची स्पर्धा, घुबडांची स्पर्धा आणि कोंबड्यांच्या झुंजी असा खेळ सुरू आहे. त्यामुळे तुला ना… मला… घाल…कुत्र्याला अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेतील महापालिका सहायक आयुक्त पदांसाठी एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे एकुण 15 क्षेत्रिय कार्यालयातील बहुतांश वॉर्ड ऑफिसर पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रभारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुळात पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये अतांत्रिक पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही अशी महत्वाची अट आहे. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात ...
पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासनचे कार्यालय की कोंडवाडा,

पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासनचे कार्यालय की कोंडवाडा,

शासन यंत्रणा
*अ वर्ग पुणे महापालिकेतील प्रशासकीय कार्यालयाची अवस्था, मुंबईतील बीडीडी चाळ आणि पुण्यातील जनता वसाहतीसारखी…*एसटी आणि रिक्षात प्रवाशी कोंबुन भरावे तसे, प्रशासकीय सेवक व फाईलचे गठ्ठे ठेवले आहेत, पावसाळ्यात तर कागदांच्या कुबट वासाने थांबुही वाटत नाही… मग सेवक कसे काम करीत असतील… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात हडपसर ते स्वारगेट, कात्रज ते स्वारगेट, मार्केट ते मंडई, मंडई ते स्वारगेट या प्रवासा दरम्यान शेअर ऑटो रिक्षामध्ये जसे प्रवाशी कोंबुन भरले जातात किंवा पुणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना जसे रिक्षावाले काका कोंबुन-कोंबुन भरतात तशी अवस्था सध्या पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाली आहे. मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळ आणि पुण्यातील जनता वसाहतीमधील घरे जशी एकमेकांना चिकटून आहेत, आणि त्यातुन जसा कुबट वास दुरपर्यंत पसरलेला असतो तशी अवस्था सामान...
बिबवेवाडी गंगाधाम चौकातील सॉलिटेअर एमटीएम ने पुणे महापालिकेचे थकविले दोन कोटी रुपये

बिबवेवाडी गंगाधाम चौकातील सॉलिटेअर एमटीएम ने पुणे महापालिकेचे थकविले दोन कोटी रुपये

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरासह दक्षिण पुण्यात बेकायदेशिर होर्डींगवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यात एका आकारमानाच्या होर्डींगला परवानगी घेवून प्रत्यक्षात जागेवर जास्त आकारमानाचे होर्डींग उभारले गेले आहेत. वर्षानुवर्षे पुणे महापालिकेचा महसुल बुडविला जात आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह व अतिक्रमण विभागावर उपआयुक्त माधव जगताप यांचीच मिरासदारी होती व आहे. त्यामुळे मागील सात/आठ वर्षात आकाशचिन्ह विभागाने पुणे महापालिकेच्या महसुलात वाढ करण्याऐवजी स्वतःचा आर्थिक विकास करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे पुणे शहरात होर्डींगचा धुमाकुळ सुरू आहे. त्यात बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील व पुण्याच्या दक्षिण भागातील सॉलिटेअर एमटीएम बांधकाम व्यावसायिकाने लहान मोठ्या आकारमानाचे सुमारे 125 पेक्षा अधिक होर्डींग उभे केले आहेत. तथापी मागील काही वर्षांपासुन त्यांनी होर्डींगचा महसुल भ...
पुणे महापालिकेतील अभियंत्याची कोट्यवधी रुपयांची उड्डाणे, प्रशासकीय राजवटीत पुणे महापालिकेत पैशांचा धो… धो…पाऊस पडतोय!

पुणे महापालिकेतील अभियंत्याची कोट्यवधी रुपयांची उड्डाणे, प्रशासकीय राजवटीत पुणे महापालिकेत पैशांचा धो… धो…पाऊस पडतोय!

शासन यंत्रणा
एकाने 75 लाखाचा फ्लॅट हार्ड कॅश घेतला, दुसऱ्याने नवीन कोथरूड मध्ये 1 कोटीचा फ्लॅट घेवून पुनः 25 लाखाची कार घेतली नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/लोकप्रतिनिधीविना पुणे महापालिका पोरकी झाली आहे. न्यायालयात प्रकरण असल्याचे कारण सांगुन राज्यातील 27 महापालिकांच्या निवडणूका मागील 2 वर्षांपासून लांबणीवर पडल्या आहेत. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. पुणे महापालिकेतही मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून, पुणे महापालिकेच्या आयुक्तांव्दारेच कारभार चालविला जात आहे. मुख्य सभा व स्थायीचा कारभार देखील प्रशासक पाहत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या विक्रम कुमारांनी तर पुणे महापालिकेवर तारे लावले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका व त्याच्या क्षेत्रिय कार्यालयांतून पैशांचा धुर निघत आहे. पैशांचा पाऊस पडत आहे. या वाहत्या पाण्यात अनेक अधिकारी गब्बर मालाम...