10 लाखाचं काम काढून 70 लाखाला चूना लावायचा, पुणे महापालिकेचे लाखाचे 12 हजार करणे विद्युत विभागाचे गुणवंत अभियंते,
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-पुणे महापालिकेने वॉर्ड ऑफिस, उपआयुक्त कार्यालयांसह खाते प्रमुख, विभाग प्रमुखांना निश्चित रकमेच्या निविदा मंजूर करण्याचे अधिकार सुपूर्द करण्यात आले आहेत. दरम्यान कुठे काम करावे, कुठे निविदा कामे करू नये, पुणे महापालिका निधीचा वापर करतांना त्याबाबत निश्चित अशी धोरणे सुधारित निवेदेत नमूद आहेत. तसेच एकाच कामावर पुन्हा दुसरे काम करू नये, क्षेत्रिय कार्यालयांनी निविदा कामे केल्यानंतर त्याच कामावर मुख्य खात्याने रक्कम खर्च करू नये, निविदा काढू नये, तसेच मुख्य खात्याने केलेल्या कामांवर पुन्हा वॉर्ड ऑफिस, उपआयुक्त व त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांनी निविदा काढू नयेत अशा तरतूदी आहेत.
तथापी क्षेत्रिय कार्यालाने केलेल्या कामांवर पून्हा मुख्य खात्याकडून कामे करण्याबाबत निविदा काढल्या जात असून, लाखाचे बारा हजार या म्हणीप्रमाणे पुणे महापालिकेतच्या विद्युत ...
