Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Mundhwa Police Station

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या 395 ...