Wednesday, January 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: Lashkar Police Station

ई-सिगारेट व तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर विरूद्ध पुण्यात सहा ठिकाणी छापा कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

ई-सिगारेट व तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर विरूद्ध पुण्यात सहा ठिकाणी छापा कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात प्रतिबंधीत ई- सिगारेट (वेप) आणि तवांखुजन्य हुक्का फ्लेवर याचा साठा करून अवैध विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. यात लष्कर पोलीस स्टेशन व कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन यांच्या हद्दीतून ई सिगारेट तसेच कोथरूड पोलीस स्टेशन व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतून तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर असा एकुण 8 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून आरोपींना चौकशीकामी संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन पुणे शहरात इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतुक विक्री साठवणुक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करीत असतांना, लष्कर पोलीस स्टेशन व कोरेगांवपार्क पोलीस स्टेशन येथे कलम 7 च 8 प्रमाणे एकुण 03 गुन्हे दाखल करण्यात आले आ...