Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Kondhwa Police Station

समर्थ व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई, अबतक @85

समर्थ व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई, अबतक @85

पोलीस क्राइम
पुण्याच्या नाना पेठेत राहणारा अमन युसूफ पठाण उर्फ खान याची अमरावती कारागृहात रवानगी नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/समर्थ व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रास्त्रे बाळगणे, दुखापत, दंगा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अमन युसुफ पठाण उर्फ खान, वय-22 राहणार- अशोक चौक, नाना पेठ, पुणे असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्तांची ही 85 वी कारवाई आहे. आरोपी अमन युसुफ पठाण उर्फ खान याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी अमन पठाण याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. नाना पेठेच...
पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या 395 ...
गुन्ह्यांचा धावता आढावा,आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती

गुन्ह्यांचा धावता आढावा,आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/आज दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजीपर्यंत पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा देण्यात आला आहे. आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती यांचा समोवश आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाँटेड आरोपीस पकडले23 लाख 26 हजाराचा “कोकेन“ ड्रग्ज हस्तगत पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त, पुणे शहर. श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरामध्ये फेब्रुवारी मध्ये साजरा होणा-या महाशिवरात्री शिवजयंती. संभाव्य व्हि.व्हि.आय.पी. व्यक्तींचे दौरे तसेच कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 15/02/2023 रोजी 21/00 वा ते दि. 16/02/2023 रोजी 02/00 वा पर्यंत ऑलआऊट / कोंबिंग ऑपरेशन राबविणे बाबत आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक 1...
टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

पोलीस क्राइम
पुणे/वृत्तविश्लेषण/national forumभारतात टूरिस्ट अर्थात पर्यटन व्हिसावर आलेल्या महिलांनी पुणे शहरातील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परकीय नागरीक नोंदणी शाखा यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खाजगी मसाज पार्लरमध्ये छापा टाकुन संबंधित महिलांना पकडून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत ज्या ज्या मसाज पार्लर स्पावर छापे मारले आहेत, त्या त्या सर्व ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. शेकडो मुली व महिलांना पकडून सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तरी देखील आजही पुणे शहरात शेकडोने नव्हे तर हजारोंनी मजसा पार्लर व स्पा सेंटर सुरू आहेत. बहुतांश मसाज पार्लर व स्पा मध्ये मोठ्या संख्येने वेश्याव्यवासाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. वेगवगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित...