
जनसुरक्षा कायदयाविरूद्ध पुण्यातील वकीलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध महामोर्चा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा विधानसभेसह विधानपरिषदेत मंजुर केला असल्याने, त्याविरूद्ध राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढले जात आहेत. जन सुरक्षा कायदयाविरूद्ध पुण्यातील वकील व सामाजिक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. संविधान रक्षक वकील फोरमच्या वतीने बुधवार दि. 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ वकीलांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या होत्या. भारतीय संविधान विरोधी असलेला जनसुरक्षा अधिनियम 2024 रद्द झालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत ज्येष्ठ वकीलांची त्यांची भूमिका मांडली.
त्यात अनेक वक्त्यांनी मते व्यक्त केली, त्यात नमूद केले की, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या बे...