पैशासाठी जिवलग मित्र झाला पक्का वैरी, साथीदाराच्या मदतीने केला मित्राचा गेम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिल,दोस्ती आणि दुनियादारीत पैश्याचा विषय आला की जिवलग मित्र देखील वैऱ्यासारखे वागु लागतात. पैशासाठी एका मित्राचा काटा काढण्यासाठी त्याने दुसऱ्याच साथीदाराला बोलावून घेतले आणि मित्राचाच घात केला. राग आणि पैसा इतका वाईट आहे की, त्याच मित्राला वारजे टेकडी येथील शनि मंदिराजवळ बोलावून त्याच्यावर लोखंडी हत्याराने गळयावर, छातीवर, पोटावर, पायावर, वार करुन व डोक्यात दगड घालुन त्याला जिवे ठार मारले. या घटनेनंतर हद्दीत खळबळ माजल्यानंतर, तसेच वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत खुनासारखी गंभीर घटना घडल्याने, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनसह पुणे शहर पोलीस दलाकडील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखेने समांतर तपास केला. यात गुन्हे शाखेने 12 तासाच्या आता गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वारजे माळवाडी पोलीस स...
