
सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात कंत्राटी कामगारांची मेगा भरती, झाडणकामांसाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर…
सिंहगड कार्यालयात पती-पत्नी, मुलगा, मुलाची पत्नी, मुलगी, मुलीचे पती, मावशी, चुलती, आत्या, सुनेचा भाऊ, मुलाचा मामा, मुलाचा साडू, विहिनबाई, विहीनबाईचा मुलगा, इत्यादी इत्यादी… अख्या कुटूंबासह यादीला नाव पण एकही कामाला नाही… आता बोला… आहे की नाही, ठेकेदार यु.आर.फॅसिलिटीची कमाल…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कंत्राटी कामगारांचा ईपीएफ व ईएसआय भरला जात नाही, किमान वेतनही दिले जात नाही म्हणून 15 क्षेत्रिय कार्यालयातील कंत्राटी कामगारांसह सुरक्षा रक्षकांची ओरड सुरू आहे. दर सहा महिन्यांनी ही नेहमीची ओरड ठरलेली आहेच. ठेकेदार नियम पाळत नाहीत, त्यामुळे कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांचा रोष वाढत आहे. तर पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात नवीन बाब समोर आली आहे. यात आत्ता तर 18 वर्षाखालील मुलांचा वापर झाडणकामांसाठी केला गेला आहे. तसेच आत्ता दर दिवशी कंत्राटी कामगारांची भरती सुरू आहे. न...