Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: balasaheb ambedkar

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण -राज्यात विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सगळीकडे निवडणूकीचा ज्वर चढला आहे. राज्यात कायम सत्तेत असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आहेत. याच पक्षात सर्वाधिक सधन मराठा समाज आहे. त्यांना त्यांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. प्रत्येक निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करतात. मतदार आणि कार्यकर्ते विकत घेण्याची त्यांची खुमखुमी आजही आहे. जाती जातीत भांडण लावणे, धर्माधर्मात भांडण लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. विकासाच्या मुद्यावर यांची निवडणूक कधीच नसते. कारण तेच आमदार, तेच खासदार असल्याने त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले आहेत, ते मतदारांना माहिती असते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढविता ते थेट जाती आणि धर्मावर...
विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : बाळासाहेब आंबेडकर

विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या यामधील आरक्षण थांबवले जाईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. हे आपल्याला मान्य आहे का? मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसींचे, एससी, एसटी आणि मुस्लीम उमेदवार की ज्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे त्यांना डोळे झाकून मतदान करा, असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. मराठा आमदार कसे निवडूण येतील याचीच रचना आखली आहे-मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची जी घोषणा आहे की, 200 आमदार विधानसभेत असतील, या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा असे म्हणून सर्वांना अर्ज भरायला लावले. निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. निजाम...
पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

राजकीय
सन 1988 ते 1991, शरद पवार - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भेट … कशासाठी? नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर छोट्या पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होतानाही दिसत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांनी दुबईतील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, 1988 ते 1991 साली शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका दौऱ्यासाठी परदेशात गेले होते. शरद पवार भारतातून लंडनला गेले होते आणि तिथून कॅलिफोर्नियाला जाऊन 2 दिवस...
भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/अमरावती-अकोला/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 41 जागांवर भाजप-शिवसेना युतीने विजय मिळवला होता. राज्यात 48 पैकी 41 खासदार भाजप-शिवसेना युतीचे होते. या खासदारांनी केंद्रातून त्यांच्या मतदारसंघाकरता किती विकास निधी आणला? खासदारांना मिळणाऱ्या दरवर्षीचा पाच कोटी रुपयांचा निधी कोणत्या कामांवर खर्च केला? किती टक्के खर्च केला? जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तो निधी कसा खर्च केला? त्यांच्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये किती नवीन शाळा, कॉलेज उभे केले? किती नवीन हॉस्पिटल उभे केले? किती शासकीय जुन्या हॉस्पिटलला आरोग्य सुविधा पुरवल्या? किती प्राथमिक आणि माध्यमिक जुन्या शाळांच्या नूतनीकरणावर भर दिला? सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण व आरोग्याच्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या? बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळवून देण...
अमरावतीत काँग्रेस-भाजपाचा जातीय-धार्मिक थयथयाट

अमरावतीत काँग्रेस-भाजपाचा जातीय-धार्मिक थयथयाट

सर्व साधारण
राहुल गांधी दिल्लीत राहतात, निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठीत व आता देशाचे शेवटचे टोक असलेल्या केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूक लढवित आहेत, हे काँग्रेसवाल्यांना चालते मग आंबेडकर अमरावतीत का चालत नाहीत…काँग्रेस भाजपाचा कपटी डाव ओळखा नॅशनल फोरम/अमरावती/दि/राहूल गांधी दिल्लीत राहतात आणि उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा निवडणूकीत उभे राहतात. आता तर अमेठी सोडून ते केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूकीला उभे राहत आहेत, हे सर्व काँग्रेसवाल्यांना चालते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती मध्ये उभे राहिल्यानंतर कॉंग्रेसवाल्यांनी थयथयाट सुरू केला आहे. दरम्यान संपूर्ण विदर्भात आंबेडकरी जनतेची प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील भंडारा लोकसभा निवडणूकीत उभे होते. आंबेडकरी घराण्याची व विदर्भाची जवळची नाळ आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर अमराव...
अमरावतीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने बळबळ उभा केलेला बळवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडाऱ्याच्या निवडणूकीत पाडणाऱ्या काँग्रेसचा बदला घेण्याची अमरावतीकरांना सुवर्ण संधी…

अमरावतीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने बळबळ उभा केलेला बळवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडाऱ्याच्या निवडणूकीत पाडणाऱ्या काँग्रेसचा बदला घेण्याची अमरावतीकरांना सुवर्ण संधी…

राजकीय
NATIONAL FORUM/ PUNE/ काँग्रेसने 25 वर्षात अमरावती लोकसभेची निवडणूक लढविली नाही. रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर अमरावतीमध्ये राखीवज जागेवर उमेदवार असल्याने काँग्रेस-भाजपाने ठरवुन काँग्रेसी आमदार बळवंत वानखेडे यांना उभे केले आहे. अमरावतीतत सर्वांना ठाऊक आहे की, बळवंत वानखेडे हे मंत्री यशोमती ठाकुर यांच्या चपला उचलतात, एवढच नाही तर यशोमती ठाकुर यांना विचारल्याशिवाय तोंडही उघडत नाहीत. त्यामुळेच अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडली तरी वानखेडे तिकडे फिरकले देखील नाहीत. त्यामुळे काँग्रेस-भाजपा यांनी गुप्त समझोता केला असून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना लोकसभा निवडणूकीत पाडण्यासाठीच 48 पैकी 1 जागेवर बौद्ध उमेदवार उभा केला आहे. काँग्रेस आघाडीने 48 पैकी एकही जागेवर मुस्लिम उमेदवार दिला नाही. एकही बौद्ध उमेदवार दिला नाही. केवळ आनंदराज आंबेडकर...
महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- आंबेडकर

महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- आंबेडकर

सामाजिक
नॅशनल फोरम/अकोला/दि/ वृत्त/डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर प्रसार माध्यमे देखील गप्प का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीने अद्याप एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल, तर दोघांमध्ये काय फरक आहे? प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालतात याबाबत प्रसार माध्यमे गप्प का? असा सवाल आंबेडकर ...
प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

राजकीय, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/राज्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. देशात 10 वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाची उणीदुणी काढण्यापेक्षा, हे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडी विरूद्ध गरळ ओकत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही. त्यांची देशात व राज्यात कुठेही सत्ता नव्हती, तरी देखील वंचित बहुजन आघाडीविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे चार पक्ष का तुटून पडले आहेत याचा विचार होणे गरजेचे ठरत आहेत. महायुती व महाविकास आघाडीने राज्यात एकाही मुस्लिम समाजातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. आंबेडकरी समुहातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. भटके, विमुक्त, आलुतेदार- बलुतेदारांना उमेदवारी दिली नाही. या समाजाने केवळ महायुती व महाविकास आघाडीला मतदान करायचे, परंतु सत्तेत वाटा मागायचा नाही असेच धोरण आजपर्...
लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपा महायुती, काँग्रेस महाविकास आघाडीतील रूसवे फुगवे..बदनामी मात्र वंचितची

लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपा महायुती, काँग्रेस महाविकास आघाडीतील रूसवे फुगवे..बदनामी मात्र वंचितची

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/भाजप प्रणित महायुती आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरलेला नाही. महायुतीत खटके उडणे सुरूच आहे. महाविकास आघाडीतही तणाव आहे. मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला असल्याची बातमी लोकमतच्या पहिल्या पानावर यदु जोशी यांच्या नावाने बातमी प्रसिद्ध केली आहे. बातमीमध्ये काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये तणाव आहे, खटके उडत आहेत. तसेच भाजप प्रणित महायुतीमध्ये देखील तणाव असल्याचे नमूद केलं आहे. दरम्यान या दोन प्रस्थापितांच्या महायुती व महाआघाडीच्या सत्तास्पर्धेच्या वादात बदनामी मात्र वंचित बहुजन आघाडीची केली जात आहे. काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत प्रथम काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या बैठका म्हणजे सत्यनारायणाची पूजा नाही असं खोचक विधान...
वंचितच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीय-समलैंगिक व्यक्तीस मोफत उच्च शिक्षणासह, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप, घरकुल योजनेतही तरतुद

वंचितच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीय-समलैंगिक व्यक्तीस मोफत उच्च शिक्षणासह, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप, घरकुल योजनेतही तरतुद

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तृतीयपंथी समाज, जोगती, आराधी या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुषित आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारच्या संधी मिळत नाहीत. शासनस्तरावरून देखील कोणत्याही तरतुदी केल्या जात नाहीत. तत्कालिन काँग्रेस राजवटीत तर ट्रान्सजेंड अर्थात तृतीयपंथीयांना दिल्लीत जबरी मारहाणीच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. आज भाजप देखील काँग्रेसचाच कित्ता गिरवित आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी मात्र कायम तृतीयपंथी, जोगती, आराधी या समाज घटनांना, मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत होता. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या कार्यकाळात त्यांनी किमान समान कार्यक्रम तयार करून महाविकास आघाडीकडे पाठविला आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने तयार केलेल्या 39 कलमी किमान समान कार्यक्रमात मुद्दा क्र. 31 वर तृतीयपंथी समाज घटकांना, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरतुद केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जाही...