Friday, January 16 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: अंमली पदार्थ विरोधी पथक

पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे पुणे महानगरपालिका निवडणुक 2026 च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने प्रतिबंधक कार्यवाही करीता पेट्रोलिंग करत असताना सुमारे 25 लाख रुपयांचा मॅफेड्रोन जप्त केला आहे. दरम्यान मागील काही काळात याच पुणे शहरात सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा एमडी जप्त केला होता. आता देखील जागोजाग अंमली पदार्थांवर कारवाई केली जात असली तरी, पुणे शहरात मेफेड्रॉन (एम.डी), गांजा, चर्रस, अफीम सारखे अंमली पदार्थ सहज मिळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते की, ज्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळुन येतील, त्या पोलीसांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान पुण्यात बहुतांश ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असतांना, आता का कारवाई केली जात ना...