
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीत ज्या सोसायट्यांमध्ये बीडब्ल्युजी प्रकल्प सुरू आहेत, तसेच ज्या सोसायट्यांनी कंपोस्ट खत व ओला कचरा जिरवित असल्याबाबत, शिफासर घेवून, पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून, त्यांच्या मिळकत करामध्ये 5 टक्के सवलत मिळविली आहे, त्यांचा ओला कचरा मोकादम व आरोग्य निरीक्षक यांना उचलण्यास प्रतिबंध केल्यामुळे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोतदार यांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (सिनिअर सॅनिटरी इन्सपेक्टर) श्री. मंगलदास माने यांच्याकडून कचरा वाहतुक व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा पदभार काढून घेण्यात आल्याचे कार्यालयीन आदेश जारी केले आहेत.

या आदेशात नमूद केले आहे की, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन कामकाजाशी संबंधित सर्व कचरा वाहतुक व्यवस्थापन व सर्व संबंधित कचरा व्यवस्थापन प्रकल्प कामकाज पुढील आदेश होईपर्यंत श्री. आशिष सुपणार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली श्री. रविराज बेंद्रे आरोग्य निरीक्षक यांनी आपले कामकाज सांभाळून सदर कामकाज सांभाळावे, सदर बाबतीत सर्व आरोग्य निरीक्षक व सर्व संबधित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचेशी समन्वय ठेऊन कामकाज करावे असेही आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक यांनी बीडब्ल्युजी (बल्क वेस्ट गार्बेज) संदर्भात तसेच नागरी घनकचरा नियम- 2016 चे प्रभावी अंमलबजावणीसाठी सुमारे एकुण 10 साप्ताहिक मिटींग मध्ये आरोग्य निरीक्षक यांना सुचना दिल्या होत्या. तसेच ज्या सोसायट्यांना 5 टक्के सवलती दिल्या आहेत, तसेच ज्या सोसासायट्यांमध्ये बीडब्ल्युजी प्रकल्प सुरू आहेत, तेथील ओला कचरा पुणे महापालिकेच्या कचरा वाहनामध्ये घेवू नये अशा सुचना दिल्या होत्या. तसेच एप्रिल ते सप्टेंबर 2025 पर्यंत सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडील मोकादम व आरोग्य निरीक्षक यांच्या एकुण 10 पेक्षा अधिक मिटींग घेवून त्याबाबतच्या सुचना व ताकीद देण्यात आली होती.
दरम्यान श्रीमती पोतदार यांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. माने यांना जातीयव्देषाने वागणूक दिल्यामुळे श्रीमती पोतदार यांच्याविरूद्ध फुले, शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध संस्था व संघटनांनी अनेक तक्रार अर्ज पुणे महापालिका आयुक्तांना सादर केले. याबाबत श्रीमती पोतदार यांनी जातीयव्देषमुलक काही घडले नाही असे पत्र श्री. माने यांना मागितले होते. तथापी त्यांनी ते पत्र दिले नसल्यामुळे या सर्वांचा राग श्रीमती पोतदार यांना आला व त्यांनी पगाराव्यतिरिक्त केवळ वरकमाईने जास्त पैसे कमाविण्यासाठी जातीयव्देष भावनेने श्री. माने यांचेबरोबर वर्तूणूक ठेवली आहे. त्यामुळे या सर्व गंभिर प्रकरणांची दखल घेवून, श्रीमती पोतदार यांच्यावर कारवाई करण्यात येवून, श्री. माने यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र या संघटनेने पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत असून, जातीयवादी प्रज्ञा पोतदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
