Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी, नेते नको-आंबेडकर

Prakash-Ambedkar

अकोला/दि/  मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न कॉंग्रेसने निरंतर प्रलंबित ठेवला आहे. कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी आहेत. मात्र, त्यांना मुस्लिमांचे नेते नको आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. अकोला येथे मुस्लीम आरक्षण महामोर्चादरम्यान ते बोलत होते.

      कॉंग्रेस मुस्लिमांचा फक्त निवडणुकीसाठी उपयोग करीत आहे. त्यामुळे त्यांना १९ टक्के आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेसने कुठलीच पावले उचलली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले. मात्र, १९ टक्के असलेल्या मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदरांनी कुठलाच दबाव आणला नसल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडे अट ठेवली असल्याचे ते म्हणाले.       ’एमआयएम’ बहुजन महासंघासोबत आहे. त्यामुळे एमआयएमला सोबत घेऊनच कॉंग्रेससोबत युती करणार असल्याचे ते म्हणाले. आघाडीसाठी १२ जागा मागितल्या आहेत. त्यामध्ये धनगर, माळी, मुस्लीम, ओबीसी, भटक्या विमुक्तसाठी प्रत्येकी २ जागा याप्रमाणे १२ जागा मागितल्या असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती बदलत असल्यामुळे जागा मागितल्या आहेत. मात्र, आता कॉंग्रेस किती बदलणार ते बघणार असल्याचे ते म्हणाले.