Friday, November 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

भाजप सरकारचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नः आ. शरद रणपिसे

Congress-vardhapan-din

मुंबई/दि/  कॉंग्रेस पक्षाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त केले व देशात लोकशाहीची बीजे रोवून ती बळकट केली. पण विद्यमान भाजप सरकार देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला पराभूत करून देशाचे संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे यांनी केले.

      कॉंग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनामित्त आज महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. रणपिसे बोलत होते.       ते पुढे म्हणाले की, विद्यमान सरकारच्या काळात देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. जाती- जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. राजकीय फायद्यासाठी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दलित, अल्पसंख्यांक समाजावर हल्ले केले जात आहेत. संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात देशातील लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आहे. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी या देशासाठी बलिदान दिले आहे. त्याचप्रमाणे आता देशातील लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते प्राणाची बाजी लावतील असे आमदार रणपिसे म्हणाले.