मानाच्या पुणे जिल्हास्तरीय पुणे श्री 2025 या स्पर्धेमध्ये प्रथमच खेळाडूंसाठी पाच गदांचा सन्मान
नॅशनल फोरम/पुणे/दि/पुणे जिल्हास्तरीय मानाची पुणे श्री 2025 या स्पर्धेचे आयोजन समीर भिवा तरस, सनी यशवंत राऊत,अजित मोहन देशमुख यांनी युनिटी फिट क्लबच्या वतीने व बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांच्या संलग्न संघटनांची मिळून केले होते. या स्पर्धेतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विजेता व उपविजेता यांना मानाच्या गदा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व रोख रकमेची मोठी बक्षिसे देण्यात आली.विनोद कागडे व महेश कानसकर यांच्या अतितटीच्या झालेल्या सामन्यात पुणे श्री 2025 चा मानकरी यु एफ सी जिमचा विनोद काकडे व उपविजेता मयूर कानसकर ठरला. मेन्स फिजिक्स पुणे श्री मानकरी सिल्वर फिटनेस जिमचा अजित तावरे व उपविजेता संदेश देशमुख ठरला. महिला गटातून आर बाउन्स फिटनेसची शितल वाडेकर यांनी मिस पुणे वुमन फिटनेस हा किताब जिंकला.
या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी संदीप तिवडे, मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा मानकरी ठ...









