प्रसारमाध्यम स्वातंत्र्याची गळचेपी
नवी दिल्ली/दि/ एका हिंदी वृत्तवाहिनीतील दोन वरिष्ठ पत्रकारांना
तडकाफडकी द्यावे लागलेले राजीनामे आणि सरकारवर टीका करणार्या कार्यक्रमाच्या प्रसारणात
वारंवार आणले गेलेले अडथळे, या प्रकारांची एडिटर्स गील्ड ऑफ इंडियाने गंभीर दखल घेतली
असून माध्यम स्वातंत्र्यातील सरकारच्या ढवळाढवळीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
माध्यम
स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी ज्या अपप्रवृत्ती काम करत आहेत त्यांच्यावर योग्यती
कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एडिटर्स गील्डने केली आहे. माध्यमांच्या मालकांनी सरकार
किंवा कोणाच्याही दडपणापुढे नतमस्तक होऊ नये, असे आवाहनही एडिटर्स गील्डने केले आहे.
जो प्रकार
घडला आहे तो माध्यम स्वातंत्र्याच्य...





