कमला नेहरू जवळील शारदा स्वीटहोम मधील सामोसा- कचोरीच्या चटणीत आढळला शिजलेला उंदीर
पुणे/दि/
सामान्यपणे
सणांच्या काळात खवा-मावा आणि मिठाईची मागणी वाढते. त्यानुसार आता गणेशोत्सव सुरू असून त्यानंतर नवरात्र, दसरा आणि
मग दिवाळी असे सण ओळीत येणार नि खवा-मावा, मिठाईची मागणी आणखी वाढणार. पण या वाढत्या
मागणीचाच फायदा घेत भेसळखोरही या काळात सक्रीय होतात. त्यामुळेच दरवर्षी खवा, मावा,
मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह इतर अन्नपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. म्हणूनच
सणासुदीच्या काळात असे पदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुण्यात
मागील आठवड्यात साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा पुणे शहर गुन्हे शाखा व अन्न व औषधण
प्रशासनाच्या मदतीने जप्त करण्यात आला आहे. भावेश पटेल (रा...