
वारजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा
पुणे/दि/ वृत्तमिमांसा/छुमक छूम नाचे, नाचेनर्तकी, शृंगारातून आले न्हाऊन, स्वर्गातल्या मेनकेसारखी. अशा प्रकारच्या रंभा, मेनका आणि उर्वशींचा संपूर्ण पुणे शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली धुमाकूळ सुरू आहे. जिथं- तिथं मसाज पार्लर. सगळीकडे वेश्याव्यवसायाचे पेव फुटले आहे. सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. भितीमुळं नागरीक घराबाहेर यायला घाबरत आहेत. परंतु शौकीन मंडळी मात्र कोरोना संकटातही छैलाबाबू म्हणून मिरवित आहेत. आणि या शौकीन छैलाबाबूंसाठी जिस्मके सौदागर पुढे आले आहेत. पुणे शहरात एकही पोलीस स्टेशन असे नसेल की जिथं मसाज पार्लर नाही. सगळीकडे मसाज पार्लर सुरू आहेत. शंभरातून केवळ एक दोघांवर कारवाई होते. कायदयाच्या कच्च्या कलमातून अटक आणि सुटका केली जात आहे. त्यामुळे पुणे शहरात सध्या जिस्मके सौदागरांचा विळखा पडला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग ह्या गुन्हेशाखेकडील यंत्रणेकडून...