Friday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण -राज्यात विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सगळीकडे निवडणूकीचा ज्वर चढला आहे. राज्यात कायम सत्तेत असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आहेत. याच पक्षात सर्वाधिक सधन मराठा समाज आहे. त्यांना त्यांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. प्रत्येक निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करतात. मतदार आणि कार्यकर्ते विकत घेण्याची त्यांची खुमखुमी आजही आहे. जाती जातीत भांडण लावणे, धर्माधर्मात भांडण लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. विकासाच्या मुद्यावर यांची निवडणूक कधीच नसते. कारण तेच आमदार, तेच खासदार असल्याने त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले आहेत, ते मतदारांना माहिती असते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढविता ते थेट जाती आणि धर्मावर वाता...
पुणे महापालिकेच्या आयुक्त आणि अति. आयुक्तांच्या आदेशांना ठेंगा दाखविण्याची माधव जगतापांची खोड सवय आहे

पुणे महापालिकेच्या आयुक्त आणि अति. आयुक्तांच्या आदेशांना ठेंगा दाखविण्याची माधव जगतापांची खोड सवय आहे

सर्व साधारण
माधव जगताप- लाखोंची बोली, कोट्यवधींचे व्यवहार? माधव जगतापांची खाबुगिरी भाग- 1 नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे महानगरपालिकेतील सुरक्षा विभाग, सुरक्षा विभाग सनियंत्रक, अतिक्रमण, आकाशचिन्ह विभाग, घनकचरा विभाग या सारखे अतिमहत्वाची खाती अनेक वर्ष स्वतःच्या कब्जात ठेवण्याची माधव जगतापांची एक प्रशासकीय कला होती व आहे. उपआयुक्त या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पुणे महापालिकेतील सर्वाधिक क्रिमी पोस्टवर त्यांनी कब्जा केला व निरंतर कोणत्याही अडथळ्याविना स्वतःकडे ठेवण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी या पदावर पायउतार झाल्यानंतर, हळुहळु त्यांच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. सध्या माधव जगताप यांनी ह्या सर्व पदांचा त्याग करून, आता पुणे महापालिकेचे हृदय असलेले टॅक्स अर्थात कर संकलन व कर आकरणी विभागाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासूनच त्यांन...
पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांसह अधीक्षक संवर्गातील बदल्यांचे सुप 23 ऑगस्ट रोजी वाजले तरी, बहुतांश सेवक त्यांच्या बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार नाहीत. पुणे महापालिकेतील बांधकाम, टॅक्स, ऑडीट, अतिक्रमण, आरोग्य, विधी व कामगार ही महत्वाची खाती म्हणून ओळखली जातात. महत्वाची खाती म्हणजे काय तर… क्रिमी खाती म्हणून ओळखली जातात. बक्कळ वरकड पैसा मिळतो. पुणेकर नागरीकांना भीती आणि दम देवून पैसे काढता येतात म्हणून त्याला क्रिमी किंवा महत्वाची खाती म्हटले जाते. पुणे महापालिकेतील प्रत्येक सेवकाला या खात्यात येण्याची ओढ असते. परंतु ह्या बदल्या सहज होत नाहीत, त्यासाठी प्रत्येकाला आयुक्तांचे नाही तर माननियांचे पाय धरावे लागतात. त्यांची सेवा करावी लागते. आता सेवा म्हणजे काय तर… ते सांगतील ती कामे स्वतःचा पदाचा अधिकार वापरून करणे, मग ते कायदेशिर असो की बेकायदेशिर… ती ...
PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

PMC PUNE- टॅक्स मध्ये दडलय काय ? खुर्चीसाठी दहा लाखाचा टोल, नव्यांना संधी मिळणार कशी?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सार्वत्रिक बदली आणि पदोन्नतीचे सनई चौघडा वाजत असतात. यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत बदली आणि पदोन्नतीचा सनई चौघडा वाजला. तसं म्हणायला गेल्यास सेवकांच्या पसंती क्रमानुसार व समुपदेशाने बदली केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात काही क्रिमी खात्यात वर्णी लागावी, म्हणून अनेकांनी माननीयांचे पाय अजून सोडलेले नाहीत. बदल्यांचे आदेश निघाले आहेत, परंतु क्रिमी खात्यातील काही सेवक खुर्ची सोडायला तयार नाहीत. हवं तर पाच लाखावरून दहा लाखाचा टोल घ्या पण मला इथेच राहू द्या, अशी गळ माननीय घातली जात आहे. नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्यावाणी मला वागवा, रात धुंदीत ही जागवा, असं सर्वत्र सुरू आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदावर माधव जगताप ...
महापालिका, शासकीय सेवेतील मागासवर्गियांचे पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाचा अडसर?

महापालिका, शासकीय सेवेतील मागासवर्गियांचे पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाचा अडसर?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणमहाराष्ट्र शासनाने वर्ग चार मधील शासकीय नोकरभरती बंद करून त्या जागा खाजगी ठेकेदारामार्फत भरल्या जात आहेत. वर्ग 3 मधील पदे देखील खाजगी ठेकेदार व कंपनीमार्फत भरण्याचे शासन निर्णय जारी केले आहेत. दरम्यान शासकीय सेवेतील एससी,एसटी,व्हीजेएनटी कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण देखील 7 मे 2021 च्या शासन निर्णयाने संपविले. आता तर जातीमधील वर्गीकरणाच्या नावाखाली संपूर्ण मागासवर्गीयांना शासकीय सेवेतून अस्पृश्य ठरविण्याचा घाट घातला गेला आहे. शासनामध्ये आधीच मागासवर्गीयांचा अनुशेष शिल्लक असतांना, पुन्हा जातीमधील वर्गीकरणाच्या नावाखाली पदे रिक्त ठेवण्यात येवून, पुढे जावून हीच पदे खुल्या गटातून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन होत असतांना देखील राज्यातील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी (शरद पगार गट+ अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे गट + शिंदे गट) म...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना, अधिकारी होऊ दयायचे नाही?

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना, अधिकारी होऊ दयायचे नाही?

सर्व साधारण
प्रशासकीय सेवेतील 15 महापालिका सहाय्यक आयुक्त पदांवर शासन किंवा तांत्रिक सेवकांची नियुक्ती,नियमांवर बोट ठेवून, प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना वॉर्ड ऑफिसर पदांपासून वंचित ठेवले नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-पुणे महापालिकेतील प्रशासकीय सेवांतर्गत सध्या खेकड्यांची स्पर्धा, घुबडांची स्पर्धा आणि कोंबड्यांच्या झुंजी असा खेळ सुरू आहे. त्यामुळे तुला ना… मला… घाल…कुत्र्याला अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेतील महापालिका सहायक आयुक्त पदांसाठी एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे एकुण 15 क्षेत्रिय कार्यालयातील बहुतांश वॉर्ड ऑफिसर पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रभारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुळात पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये अतांत्रिक पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही अशी महत्वाची अट आहे. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आ...
बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

सर्व साधारण
महाराष्ट्रातील 800 पैकी 799 जातींना डोक्यावर घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ह्यांना जाती- जाती आणि धर्मा धर्मात… हिंदू - मुस्लिम खेळात गुंतवून ठेवून 70 वर्ष सत्ता राखली व आताही पुढील 70 वर्ष आमचेच असतील. विषय प्रवेश -बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे याचा खालील प्रमाणे उहापोह केला आहे. देशात एकुण 6 हजार जाती आहेत. तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या आसपास असून राज्यात 800 पेक्षा अधिक जाती धर्माचे लोक राहतात. दरम्यान मागील महिन्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत 800 जातीपैंकी केवळ एकाच जातीचे 31 खासदार निवडणूक आणण्यात आपल्यास यश आले आहे. आता विधानसभेच्या निवडणूका देखील तोंडावर आहेत. त्यातच सध्याच्या विधानसभेत एकाट्या मराठा समाजाचे 190 आमदार आहेत. तर ओबीसींचे 11 आमदार आहेत. एससी/एसटीच्या आरक्षणाच्या 58 आमदार आहेत. दरम्यान बाळासाहेब आंबेडक...
बिबवेवाडी गंगाधाम चौकातील सॉलिटेअर एमटीएम ने पुणे महापालिकेचे थकविले दोन कोटी रुपये

बिबवेवाडी गंगाधाम चौकातील सॉलिटेअर एमटीएम ने पुणे महापालिकेचे थकविले दोन कोटी रुपये

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरासह दक्षिण पुण्यात बेकायदेशिर होर्डींगवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यात एका आकारमानाच्या होर्डींगला परवानगी घेवून प्रत्यक्षात जागेवर जास्त आकारमानाचे होर्डींग उभारले गेले आहेत. वर्षानुवर्षे पुणे महापालिकेचा महसुल बुडविला जात आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह व अतिक्रमण विभागावर उपआयुक्त माधव जगताप यांचीच मिरासदारी होती व आहे. त्यामुळे मागील सात/आठ वर्षात आकाशचिन्ह विभागाने पुणे महापालिकेच्या महसुलात वाढ करण्याऐवजी स्वतःचा आर्थिक विकास करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे पुणे शहरात होर्डींगचा धुमाकुळ सुरू आहे. त्यात बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील व पुण्याच्या दक्षिण भागातील सॉलिटेअर एमटीएम बांधकाम व्यावसायिकाने लहान मोठ्या आकारमानाचे सुमारे 125 पेक्षा अधिक होर्डींग उभे केले आहेत. तथापी मागील काही वर्षांपासुन त्यांनी होर्डींगचा महसुल भरला न...
भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/अमरावती-अकोला/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 41 जागांवर भाजप-शिवसेना युतीने विजय मिळवला होता. राज्यात 48 पैकी 41 खासदार भाजप-शिवसेना युतीचे होते. या खासदारांनी केंद्रातून त्यांच्या मतदारसंघाकरता किती विकास निधी आणला? खासदारांना मिळणाऱ्या दरवर्षीचा पाच कोटी रुपयांचा निधी कोणत्या कामांवर खर्च केला? किती टक्के खर्च केला? जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तो निधी कसा खर्च केला? त्यांच्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये किती नवीन शाळा, कॉलेज उभे केले? किती नवीन हॉस्पिटल उभे केले? किती शासकीय जुन्या हॉस्पिटलला आरोग्य सुविधा पुरवल्या? किती प्राथमिक आणि माध्यमिक जुन्या शाळांच्या नूतनीकरणावर भर दिला? सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण व आरोग्याच्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या? बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळवून देण्यासा...
अमरावतीत काँग्रेस-भाजपाचा जातीय-धार्मिक थयथयाट

अमरावतीत काँग्रेस-भाजपाचा जातीय-धार्मिक थयथयाट

सर्व साधारण
राहुल गांधी दिल्लीत राहतात, निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठीत व आता देशाचे शेवटचे टोक असलेल्या केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूक लढवित आहेत, हे काँग्रेसवाल्यांना चालते मग आंबेडकर अमरावतीत का चालत नाहीत…काँग्रेस भाजपाचा कपटी डाव ओळखा नॅशनल फोरम/अमरावती/दि/राहूल गांधी दिल्लीत राहतात आणि उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा निवडणूकीत उभे राहतात. आता तर अमेठी सोडून ते केरळ मधील वायनाड मध्ये निवडणूकीला उभे राहत आहेत, हे सर्व काँग्रेसवाल्यांना चालते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती मध्ये उभे राहिल्यानंतर कॉंग्रेसवाल्यांनी थयथयाट सुरू केला आहे. दरम्यान संपूर्ण विदर्भात आंबेडकरी जनतेची प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील भंडारा लोकसभा निवडणूकीत उभे होते. आंबेडकरी घराण्याची व विदर्भाची जवळची नाळ आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर अमरावतीत उ...