
पुण्याच्या सा.बां. विभागातील स्थापत्य अभियंता सहायकांची बदली होतच नाही
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील बदल्या हा एक चर्चेचा विषय झाला आहे. अधीक्षक अभियंता हे नियमानुसार बदल्यांचे आदेश जारी करतात, परंतु बदलीच्या जागी कुणीच हजर होत नाही. पुण्याच्या सा.बां. विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसण्याचा ठेका इथल्या कर्मचार्यांनी घेतला आहे. अधीक्षक अभियंत्यांचा आदेश असला तरी तो बासनात कसा गुंडाळून ठेवायचा ह्याच गणित या खात्यातील अभियंत्यांना पुरतेपणी ठाऊक झाले आहे. त्यामुळे पुण्यातील सा.बां. विभागातील बदल्यांबाबत काही ठोस निर्णय अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण हे घेणार आहेत की, ये रे माझ्या मागल्या म्हणून कारकुनी पद्धतीचा कारभार करणार आहेत असा प्रश्न आज याच खात्यातील कारभारी मंडळी करीत आहेत.
मागच्या आठवड्यात पुण्यातील सा.बां. विभागातील क.लि. बाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर, आता याच विभागातील स्थापत्य अभियंता सहायक यांच्या बदल्याच होत नसल्याची म...