Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर, सर्वाधिक धनगरांना ६ जागा, बौद्धांसह २१ जातींना उमेदवारी

Prakash-Ambedkar

मुंबई/दि/ प्रतिनिधी/

    मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या रेकॉर्डब्रेक जाहीर सभा झाल्या.लोकसभा निवडणूकीच्या तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवार निश्‍चित केले. दरम्यान मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वेगवेगळ्या समाजाला सत्तेच्या जवळ नेण्याची महत्वकांक्षा बाळगलेल्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपली पहिली यादी जाहीर केली. जाहीर केलेले उमेदवार हे महाराष्ट्रातील त्या त्या जिल्ह्यात वर्षानुवर्षे राजकीय सामाजिक क्षेत्रात कामे करीत आलेली आहेत. परंतु त्यांना संधी मात्र कोणत्याही पक्षाने दिली नाही. अशाच उमेदवारांना बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे.

    तब्बल ३६ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१  विभिन्न जातीच्या उमेदवारांना आंबेडकरांनी उमेदवारी दिली आहे. विशेष  म्हणजे, या पहिल्या यादीत स्वत: आंबेडकरांचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. बौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २,  तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे

    धनराज वंजारी ( वर्धा ), किरण रोडगे ( रामटेक ), एन के नान्हे ( भंडारा  गोंदिया ) , डॉ. रमेश गजबे ( गडचिरोली चिमूर ) राजेंद्र महाडोळे (चंद्रपुर ), प्रवीण पवार (यवतमाळ  वाशीम), बळीराम सिरस्कार (बुलढाणा ), गुणवंत देवपारे (अमरावती ), मोहन राठोड ( हिंगोली ), प्रा. यशपाल भिंगे ( नांदेड ), आलमगीर खान ( परभणी), प्रा. विष्णू जाधव (बीड ), अर्जुन सलगर ( उस्मानाबाद ), राम गारकर ( लातूर ), अंजली बावीस्कर ( जळगाव ), नितीन कांडेलकर ( रावेर ), डॉ. शरदचंद्र वानखेडे ( जालना ), सुमन कोळी ( रायगड ), अनिल जाधव ( पुणे ), नवनाथ पडळकर ( बारामती ), विजय मोरे ( माढा ), जयसिंग शेंडगे ( सांगली ) मारूती जोशी ( रत्नागिरी  सिंधुदुर्ग ), डॉ. अरुणा गवळी ( कोल्हापूर ), अस्लम बादशाजी ( हातकंणगले ), दाजमल मोरे ( नंदुरबार ), बापू बर्डे ( दिंडोरी ), पवन पवार ( नाशिक ), सुरेश पडवी (पालघर ), डॉ. ए. डी. सावंत ( भिवंडी ), मल्लिकार्जुन पुजारी ( ठाणे ), डॉ. अनिल कुमार (मुंबई दक्षिण ), डॉं. संजय भोसले ( मुंबई दक्षिण मध्य ), संभाजी शिवाजी काशीद ( ईशान्य मुंबई ), राजाराम पाटील ( मावळ ), डॉ. अरूण साबळे ( शिर्डी )

म्हणून उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख :आंबेडकर

    वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात येऊ लागले होते. त्यावर, आंबडेकरांनी सांगितले, ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलेल. असा विश्वास व्यक्त केला.

    वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावे घोषित करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख करण्यात आला होता. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.     उमेदवारांच्या जातीबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, आज आम्ही जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षात मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली. आज आम्ही त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणूनच तिकिट दिले आहे. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.