Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

फुटपाथवर बसून दारू पिणाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात महाभकास आघाडीच्या उमेदवारांना पुरोगामी उमेदवार म्हणून प्रमोशन करू नये

फुटपाथवर बसून दारू पिणाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात महाभकास आघाडीच्या उमेदवारांना पुरोगामी उमेदवार म्हणून प्रमोशन करू नये

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ aniruddha shlan chavan-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरत असताना प्रत्येक उमेदवाराला त्याच्याकडील सर्व संपत्तीसह त्याच्यावरील गुन्हे, कोर्ट खटले याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोणाकडे किती अधिकृत संपत्ती आहे त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून पाहायला मिळत आहे. प्रत्येक प्रस्थापित पक्षाचा उमेदवार हा कोट्याधीश, अब्जाधीश असल्याचे दिसून आले आहे. कुणाची 100 कोटीची प्रॉपर्टी, कोणाची 500 कोटीची प्रॉपर्टी, कोणाचे 800 कोटीची प्रॉपर्टी…. ही झाली अधिकृत संपत्तीची आकडेवारी…दरम्यान बेनामी संपत्ती किती असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. राज्यातील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार,...
आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आपण दलित आहोत की आदिवासी, ओबीसी आहोत की, भटके विमुक्त हे सर्व आरक्षणाच्या कक्षेत येतात. ज्या ज्या समाज घटकांनी, ज्या ज्या लहान मोठ्या पक्षांनी काँग्रेस किंवा भाजपाला आजपर्यंत समर्थन दिले ते सर्व पक्ष, संघटना नेस्तनाबुत झाले आहेत. नामशेष झाले आहेत. मुस्लिम समाजाने आजपर्यंत काँग्रेसला साथ दिली, आज त्याच मुसलमानांना काँग्रेसने 288 पैकी 3 जागा दिल्या आहेत, शिवसेना ठाकरे गटाने 288 पैकी एकाही मुसलमानाला उमेदवारी दिली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 288 पैकी केवळ 2 ठिकाणी मुसलमानांना उमेदवारी दिली आहे. राज्यात मुस्लिमांची संख्या दोन ते अडीज कोटी आहे. एवढ्या मोठ्या समाजाला एकाही पक्षाने आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी उमेदवारी देत नाहीत. महाराष्ट्रातून मुस्लिम आणि ओबीसीचा एकही खासदार नसावा ही मोठी शोकांतिका आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांची मते आम्हालाच...
राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारी व्यावसायिकांचा बिमोड करून, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाची धडक अतिक्रमण कारवाई, वाहतुक कोंडीतून नागरीकांची सुटका

राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारी व्यावसायिकांचा बिमोड करून, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाची धडक अतिक्रमण कारवाई, वाहतुक कोंडीतून नागरीकांची सुटका

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गणपती माथा ते शिंदे पूल हा एनडीए कडे जाणारा रस्ता कायमच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या वाहनांनी गजबजलेला असतो. नागरिकांना रस्त्यावरून जाताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. दरम्यान गेली अनेक वर्ष नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रारी येत होत्या, परंतु काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यवसायिक व राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणी कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यावसायिकांचा बिमोड करून अतिक्रमण विभाग व मध्यवर्ती पथकाकडून धाडसी कारववाई आज करण्यात आली. कारवाई करत असीतारंना, वाहनांची पळापळ, कर्मचाऱ्यांच्या अंगावरही धावुन आले-या कारवाईत 16 व्यावसायिक टेम्पो, 06 बिगर टप हातगाडी, 1 टप हात गाडी, 3 नग होजिअरी, 3 लोखंडी काउंटर, 3 गॅस सिलेंडर, 1 फ्रीज, 1 लोखंडी बाकडा व ...
दलित-मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही!

दलित-मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही!

राजकीय
धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही, धर्मनिरपेक्ष म्हणून ज्यांना मतदान केले, ते भाजपा शिवसेनेसोबत गेले. आपल्या उमेदवाराला दिलेले मत वाया जात नाही, समाजाची एकजुट दाखविल्यास, प्रस्थापित पक्षही आपल्या पायाशी येतील… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यातील काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीतील सर्वच राजकीय पक्ष हे केवळ एकाच जातीचे आहेत. वर्षानुवर्षे तेच आमदार, तेच खासदार होतात. कधी ह्या पक्षात तर कधी त्या पक्षात अशा कोलांटउड्या मारून कायम सत्तेत राहण्याची जादू करून दाखवित असतात. प्रत्येक निवडणूकीत दलित व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना कधीच उमेदवारी दिली जात नाही, तसेच या समाजातील मतदारांना कधीच विश्वासात घेतले जात नाही. केवळ जाती जाती व धर्माधर्मात भांडण लावले की यांचे काम झाले. भितीपोटी हा समाजा एकतर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीतील पक्षांना मतदान करतो नाहीतर भा...
सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण -राज्यात विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सगळीकडे निवडणूकीचा ज्वर चढला आहे. राज्यात कायम सत्तेत असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आहेत. याच पक्षात सर्वाधिक सधन मराठा समाज आहे. त्यांना त्यांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. प्रत्येक निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करतात. मतदार आणि कार्यकर्ते विकत घेण्याची त्यांची खुमखुमी आजही आहे. जाती जातीत भांडण लावणे, धर्माधर्मात भांडण लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. विकासाच्या मुद्यावर यांची निवडणूक कधीच नसते. कारण तेच आमदार, तेच खासदार असल्याने त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले आहेत, ते मतदारांना माहिती असते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढविता ते थेट जाती आणि धर्मावर वाता...
विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : बाळासाहेब आंबेडकर

विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या यामधील आरक्षण थांबवले जाईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. हे आपल्याला मान्य आहे का? मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसींचे, एससी, एसटी आणि मुस्लीम उमेदवार की ज्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे त्यांना डोळे झाकून मतदान करा, असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. मराठा आमदार कसे निवडूण येतील याचीच रचना आखली आहे-मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची जी घोषणा आहे की, 200 आमदार विधानसभेत असतील, या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा असे म्हणून सर्वांना अर्ज भरायला लावले. निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. निजामी मरा...
धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाकडून तळजाई वसाहत येथे मतदार जागृती अभियान

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाकडून तळजाई वसाहत येथे मतदार जागृती अभियान

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने परिमंडळातील क्रमांक 3 मधील पर्वती विधानसभा मतदारसंघातील तळजाई वसाहती मधील गल्ल्या मधून मतदान जनजागृती करण्यात आली. धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक समाज विकास अधिकारी संदीप कोळपे, समूह संघटिका सोनाली जगताप, ललिता सूर्यवंशी, सीमा सोनार, वर्षा मांढरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस,अतिक्रमण निरीक्षक श्री अमोल लावंड यांच्या उपस्थितीत तळजाई वसाहत येथील परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये जनजागृती करणे, नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी विशेष मोहीम अंतर्गत खडकवासला मतदार संघामध्ये नागरिकांना सविस्तर माहिती दिली. एकूण 73 महिला व 11 पुरुष एकूण मतदार 84 उपस्थित होते. नागरिकांनी मतदान जनजागृती मध्ये उत्स्फूर्त ...
वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनाधिकृत फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनाधिकृत फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील मुंबई बेंगलोर महामार्गावर गेले अनेक दिवस नागरिकांना पथारी व्यावसायिकांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. परंतु संबंधित व्यवसाय धारक हे खाजगी जागेत असल्याचे भासऊन अनधिकृतरित्या महामार्गावर व्यवसाय करीत असल्याचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांनी निदर्शनास आणून दिल्याने त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत साधारण 06 बिगर टप हातगाडी, 1 लोखंडी काउंटर, 14 मोठे टायर, 2 टेंथ, 1 वजन काटा, 6 कॅरेट फळ पथारी, 1 गॉगल स्टॅन्ड, 25 टेडी, 20 चादरी, 5 गाद्या व 40 रजया जप्त करण्यात आल्या व 5 कच्चे शेड पाडून टाकण्यात आले. सदर ठिकाणी व्यावसायिकांनी कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात विरोध केला, परंतु विरोधाला न जुमानता ही करावाई चालू ठेवली. वारजे क...
पुणे महापालिकेच्या आयुक्त आणि अति. आयुक्तांच्या आदेशांना ठेंगा दाखविण्याची माधव जगतापांची खोड सवय आहे

पुणे महापालिकेच्या आयुक्त आणि अति. आयुक्तांच्या आदेशांना ठेंगा दाखविण्याची माधव जगतापांची खोड सवय आहे

सर्व साधारण
माधव जगताप- लाखोंची बोली, कोट्यवधींचे व्यवहार? माधव जगतापांची खाबुगिरी भाग- 1 नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे महानगरपालिकेतील सुरक्षा विभाग, सुरक्षा विभाग सनियंत्रक, अतिक्रमण, आकाशचिन्ह विभाग, घनकचरा विभाग या सारखे अतिमहत्वाची खाती अनेक वर्ष स्वतःच्या कब्जात ठेवण्याची माधव जगतापांची एक प्रशासकीय कला होती व आहे. उपआयुक्त या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पुणे महापालिकेतील सर्वाधिक क्रिमी पोस्टवर त्यांनी कब्जा केला व निरंतर कोणत्याही अडथळ्याविना स्वतःकडे ठेवण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी या पदावर पायउतार झाल्यानंतर, हळुहळु त्यांच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. सध्या माधव जगताप यांनी ह्या सर्व पदांचा त्याग करून, आता पुणे महापालिकेचे हृदय असलेले टॅक्स अर्थात कर संकलन व कर आकरणी विभागाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासूनच त्यांन...
पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

राजकीय
सन 1988 ते 1991, शरद पवार - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भेट … कशासाठी? नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर छोट्या पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होतानाही दिसत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांनी दुबईतील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, 1988 ते 1991 साली शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका दौऱ्यासाठी परदेशात गेले होते. शरद पवार भारतातून लंडनला गेले होते आणि तिथून कॅलिफोर्नियाला जाऊन 2 दिवस थांब...