Tuesday, March 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

भारतीच्या हद्दीत दारू दुकानात राडा- लुटालूट- कौशल्यपूर्ण कामगिरीत राडा बहाद्दरांना दोन तासात केले जेरबंद

भारतीच्या हद्दीत दारू दुकानात राडा- लुटालूट- कौशल्यपूर्ण कामगिरीत राडा बहाद्दरांना दोन तासात केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका दारूच्या दुकानात अजय पांचाळ, तेजस वाडेकर, सोहेल आसंगी, गोविंद लोखंडे, सोन्या कांबळे, अमोल ढावरे यांनी दुकानामध्ये येवुन फिर्यादी व मॅनेजर यांना शिवीगाळ करुन अजय पांचाळ याने फिर्यादी यांचे दुकान मालकांना फोन करुन “ मी अजय पांचाळ असुन मी आताच जेल मधुन बाहेर सुटुन आलोय, तुला आलोय कळत नाही का… हप्ता चालु करायला, हप्ता चालु केला नाही तर तुला सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर वर नमुद सर्वांनी फिर्यादी यांच्या दुकानातील दारुच्या बाटल्या, थंड पेयाच्या बाटल्या, काचेचे ग्लास, दगड फेकुन दुकानातील दारुच्या बाटल्या. टीव्हीचे नुकसान केले.. त्यानंतर अजय पांचाळ याने दुकानातील काऊंन्टर मध्ये असलेले दहा हजार रुपये जबरदस्तीने घेवुन दुकानाचे बाहेर येवुन दगडी फेकुन आरडओरड केली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिनांक 24/05/2023 रोजी तक्रार दिल्याने भारती ...
कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आठवड्यातील सर्वांना सुटीचा असलेला वार म्हणजे रविवार. परंतु हाच रविवार मात्र पोलीसांना शांतपणे बसू न देण्याचा देखील वार ठरत आहे. काल शनिवार व रविवारी पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत चोरी आणि दरोड्याचे प्रकार समोर आले असून, जिकडे तिकडे चोरी आणि दरोडा… पुढे काय तर घरेदारे सोडून आता भर रस्त्यावर चोर लुटारूंनी लुटालुटीचा खेळ सुरू करून पुणे पोलीसांना आव्हान दिले आहे. काल रविवारी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशन सह शनिवारी स्वारगेट, खडकी व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत भर रस्त्यावर चोरी व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील हॉटेल चालकांचा सविनय कायदेभंग, पोलीस मात्र कशात आहेत दंग -दुकान अधिनियम व पोलीस नियमानुसार, रात्रौ 11 वाजेपर्यंत सर्व खाजगी दुकाने उघडी ...
पुणे महापालिकेची लाखकोटीची बदनामी करणाऱ्या त्या 8 प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी मूळ खात्यात पदभार स्वीकारला नाही

पुणे महापालिकेची लाखकोटीची बदनामी करणाऱ्या त्या 8 प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी मूळ खात्यात पदभार स्वीकारला नाही

शासन यंत्रणा
आयुक्त, अति. आयुक्त कारवाई करण्यापासून त्यांना संरक्षण कशासाठी …पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महापालिकेतील10 हजार कंत्राटी कामगार व खाजगी सुरक्षा रक्षकांचे किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय, कंत्राटी कामगार यांना सुरक्षा प्रावरणे, साहित्य आदि सर्वांमध्ये महाघोटाळा केल्यामुळे मागील सहा वर्षात पुणे महापालिकेवर शेकडोंनी आंदोलने झाली. यामुळे संपूर्ण राज्यात पुणे महापालिकेची नाहक बदनामी झाली. अ वर्ग असलेल्या महापालिकेची मान शरमेने खाली गेली. त्यात मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी दौंडकर, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांच्यासह 1. अमित अरविंद चव्हा, 2. आदर्श गुरूपाद गायकवाड, 3. प्रविण वसंत गायकवाड 4. माधवी सोपान ताठे 5. लोकेश लोहोट, 6. चंद्रलेखा गडाळे 7. सुरेश दिघे 8. बुगप्पा किस्टप्पा कोळी या आठ कर्मचाऱ्यांनी महापालिकेची नाहक बदनामी केली आहे. संविधान परिषदेसह अन्य संघटनांनी आंदोलन केल्...
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील खून, हत्याकांड, दरोडा, घातपात, फसवणूक, देहव्यावारासह अमली पदार्थांचा खुलेआम बाजार…कोरेगाव पार्क मध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ब्रिटिश काळापासून ते आज पर्यंत पुण्यातील कोरेगाव पार्क हा परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या निरीक्षणाखाली असलेला भूभाग आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हाधिकारी पुणे यांच्या स्वतंत्र निरीक्षणाखाली असलेल्या कोरेगाव पार्क, कल्याणी नगर परिसरात शेकडोंच्या आसपास स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असताना. त्याच्यावर कारवाई केली जात नाही. सेक्स टुरिझम च्या नावाखाली संपूर्ण कोरेगाव पार्क हद्दीत दिवस-रात्र 24 तास देश विदेशातील मुली व महिलांचा बाजार भरविला जात असताना, त्याच्यावर कायद्यातील कठोर तरतुदींचा वापर केला जात नाही. दरम्यान मागील एक दीड वर्षात संपूर्ण कोरे...
मार्केटयार्ड, सिंहगड रोड व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सहा लाखापेक्षा अधिक रकमेची चोरी दरोडा

मार्केटयार्ड, सिंहगड रोड व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सहा लाखापेक्षा अधिक रकमेची चोरी दरोडा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 6 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची घरफोडी व दरोड्याचे प्रकार समोर आले आहेत. गुन्ह्यांची हकीकत अशी की मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी या गाळ्यासमोरील सार्वजनिक शौचालया बाहेर फिर्यादी व त्यांचा भाऊ मार्केट यार्ड मध्ये मध्ये माल विक्री करण्याकरिता आले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर लघुशंका करीत असताना जवळच झाडाखाली असलेल्या एका आरोपी इसमाने ही लघवी करण्याची जागा आहे का... येथून बाहेर जा... म्हणून मार्केटयार्ड मध्ये माल विक्री करण्याकरिता आलेल्या फिर्यादी यांना शिवीगाळ करून, हाताने मारहाण करून, त्यांच्या गळ्य...
पुण्यात तडीपार गुन्हेगारांचा मुक्त संचार ,मध्यरात्रीस खेळ चाले लुटालुटीचा

पुण्यात तडीपार गुन्हेगारांचा मुक्त संचार ,मध्यरात्रीस खेळ चाले लुटालुटीचा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार आरोपी गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून एमपीडीए व मकोका अन्वये कारवाया केल्या जात आहेत. तथापि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या आरोपी गुन्हेगारांचा पुणे शहरात मुक्तपणे संचार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी केलेल्या कारवाईवरून दिसून आलेले आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ने केला पर्दाफाश-भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दिवसा व मध्यरात्री लुटालुटीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच प्रकरण 28 एप्रिल 2023 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घडले होते. 28 एप्रिल 2023 रोजी डीपी कलेक्शन समोर चिंतामणी ज्ञानपीठ येथील रोडवर फिर्यादी त्यांची चार चाकी वाहन पार्क करून लघुशंका करण्यासाठी थांबले असता,...
गुरुवार पेठेत पायी जाणाऱ्या डॉक्टर महिलेची सोनसाखळी हिसकावली, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी पाठलाग करून चोरास पकडले …

गुरुवार पेठेत पायी जाणाऱ्या डॉक्टर महिलेची सोनसाखळी हिसकावली, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी पाठलाग करून चोरास पकडले …

पोलीस क्राइम
घोरपडे पेठेतील तरुणांचा खडक पोलिसांकडून सत्कार नॅशनल फोरम /पुणे /दि/ प्रतिनिधी/पुण्यातील गुरुवार पेठेत भर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर महिलेची सोनसाखळी चोरीचा प्रकार घडला असून पळून जाणाऱ्या चोरास घोरपडे पेठ येथे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी पळून जाणाऱ्या चोराचा पाठलाग करून त्याला पकडले आहे . याबाबत फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सतीश गोवेकर खडक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव यांनी या धाडसी तरुणांचा सत्कार केला आहे गुन्ह्याची हकीकत अशी की, १६ मे २०२३ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महिला डॉ. अर्णिका अखिलेश सिंग वय २९ वर्षे, रा . शांतीनगर सोसायटी, गुरुवार पेठ पुणे या पायी चालत घरी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चैन जबरीने चोरून तेथून पळ काढला . त्यावेळी त्या मदतीसाठी ओरडल्या असता घोरपडे पेठ येथे क्रिकेट ख...
फुकटच्या जादा पैशाचे अमिष पुणेकरांना पडले महागात, पुण्यात 395 चा उद्रेक, 420 ही कमी नाहीत…

फुकटच्या जादा पैशाचे अमिष पुणेकरांना पडले महागात, पुण्यात 395 चा उद्रेक, 420 ही कमी नाहीत…

पोलीस क्राइम
395 मध्ये तथाकथित पत्रकार, कार्यकर्त्यांसह पोलीसांचाही सहभाग420 मध्ये खाजगी सावकार सामान्यांना गंडा घालतात, तर याच खाजगी सावकारांना शेअर मार्केट मधील लॉबी गंडा घालत आहे… पुणे/दि/ अनिरूद्ध शालण चव्हाण/पाण्यातील मासा, पाणी कधी पितो हे कुणालाच ठाऊक नसते…. लहान माश्याला मोठे मासे खातात हा निसर्ग नियम आहे…. एससी,एसटी वर ओबीसींसह प्रस्थापित सवर्ण मंडळी असंवैधानिक अत्याचार करीत असतात… अगदी तस्संच काहीस पुणेकरांचे झाले आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, सगळे जादा पैशाच्या मागे लागले आहेत. त्यातच पुणे शहरात सध्या मटका, जुगार अड्डयांचे महाव्दार उघडले आहे. गैरकायदयाच्या मंडळींनी त्या त्या हद्दीत एकत्र येऊ गैरकायदयाची कामे वेगात सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र ज्यादा पैशाच्या अमिषाने खाजगी सावकार सर्वसामान्य किरकोळ दुकानदार, नोकरदार,गृहिणी यांच्याकडून दुप्पट, तिप्पट व्याज वसूल करीत आहे, तर हेच खाजग...
उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?

उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?

राजकीय
अकोला/दि/ प्रतिनिधी/सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. यावेळी त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली. या निरीक्षणांवरून आमच्या बाजूने निकाल लागल्याच्या प्रतिक्रिया दोन्ही गटांकडून व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले. काल त्यांनी निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर आता वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. आक्रमक भूमिका घ्या -न्यायालयाच्या निर्णयातून आज उद्धव ठाकरे यांना मोठं हत्यार मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. तरचं ते आमदार अपात्र होतील असा जाहीर सल्ला वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषद बोलत होते. हा जाहीर सल्ला देतोय. कारण ज्यावेळी गोंधळला माणूस असतो, त्यावेळी खरी सल्ल्याची गरज असते, अस...
अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहनसोशल मीडियाचा वापर करत दंगल भडकवण्याचा काम सुरू अकोला/दि/ प्रतिनिधी/अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.आज झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मी स्वतः दोन्ही समाज घटकांशी बोलण्याचा मी दिवसभर प्रयत्न करीत होतो. शहरात शांतता राहिली पाहिजे. दरम्यान अकोला शहरात शांतता आली आहे असे दिसत असले तरीही वातावरण तापते आहे असे मला दिसत आहे.हिंदू व मुस्लिम या दोन्ही समुदयांना मी शांततेचे आवाहन करीत आहे. शेवटी या दंगलीतून काहीही निष्पन्न होत नाही, नुकसान हेोते. त्याच्यामुळे यापुढे दंगल होणार नाही याचे दक्षता दोन्ही समाजाने घ्यावी असे आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे....