Thursday, August 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Author: nationalforum

देशात गेल्या २० वर्षात बेराजगारीत सर्वाधिक वाढ

देशात गेल्या २० वर्षात बेराजगारीत सर्वाधिक वाढ

सर्व साधारण
नवी दिल्ली : देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात भीषण समस्या बनताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब आणखी नव्याने पुढे आली आहे. गेल्या २० वर्षांच्या कालावधींचा अभ्यास केल्यास, सध्या बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.                 देशात वाढत्या लोकसंख्येसोबतच बेरोजगारीमध्येही मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास २.३ टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण २०१५ मध्ये ५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक असून १६ टक्के तरुण बरोजगार आहे.                  स...

५ हजार कोटींचा घोटाळा करून आणखी एक उद्योजक विदेशात फरार

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/  पाच हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं उघड झाले आहे.                 मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजार कोटींचा घोटाळा केल्यामुळे सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असणारा नितीन संदेसरा दुबईत नसून नायजेरियात लपला आहे. सीबीआय आणि ईडीने गुजरातमधील बडोद्यातील स्टार्लिंग बायोटेकचे संचालक नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दिक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाऊंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप गर्ग आणि काही अज्ञातांविरोधात बँकांची पाच हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.             &nb...

महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे घटनाबाह्य

सामाजिक
नवी दिल्ली : शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही’, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.                 शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू झालेल्या तरुणींना आणि महिलांना प्रवेश नाकारण्याबाबत यंग लॉयर्स असोसिएसनने दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड यांनी महिलांच्या बाजूने एकमताने...

भगवे झेंडे घेतलेल्या जमावाकडून दगडफेक-कोरेगाव भीमा हिंसाचार

सामाजिक
मुंबई/दि/ कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष काढणार्या पुण्याच्या सत्यशोधन समितीचे सदस्य भीमराव बनसोड यांनी गुरुवारी चौकशी आयोगापुढे साक्ष नोंदविली. ‘१ जानेवारीला भगवे झेंडे घेऊन हजारोंचा जमाव कोरेगाव भीमा येथे दाखल झाला. हे लोक स्थानिक नव्हते. या जमावाने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या जमावावर दगडफेक केली,’ असा निष्कर्ष त्यांनी या अहवालात काढला आहे.                 सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, वढूच्या रहिवाशांना १ जानेवारीला काहीतरी अघटित घडणार याची चाहूल लागली होती. कारण गोविंद गोपाळ समाधीच्या शेडची तोडफोड करण्यात आली. तेथील फलकही काढला होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ काहीतरी अघटित घडणार, अशी अफवाही पसरली होती.         &nbs...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उघड पैसे खात , तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार : आंबेडकर

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उघड पैसे खात , तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार : आंबेडकर

राजकीय
सोलापूर/दि/ प्रतिनिधी/                  सर्वसामान्यांच्या पैशावर आजवर कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह भाजप-शिवसेनेने डल्ला मारला. फरक इतकाच, की कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उघड पैसे खात होते, तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार केला जातोय’’, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सोलापुरात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात केला.                   बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले ,२०१४च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मोदी हे सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान आहेत. पुण्यातील सभेत मोदी यांना चोर म्हटल्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु, माझ्यावर कितीह...

भारतात डॉक्टरांना ओळखता येत नाही क्षयरोगाची लक्षणे

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/ भारतातील खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर हे क्षयरोग या गंभीर आजाराची लक्षणेच ओळखू शकत नाही आणि या कारणाने रुग्णांवर योग्य ते उपचार होऊ शकत नाही, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.                 या अभ्यासात त्या लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते जे या आजाराची लक्षणे दाखवण्याचा अभिनय करु शकतील. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असून भारत, चीन आणि इंडोनेशियासहीत इतरही काही देशांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार, २०१७ मध्ये या आजाराने १७ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या आजाराला मुळातून नष्ट करण्यासाठी बुधवारी संयुक्त राष्ट्रमध्ये एक वैश्‍विक आरोग्य संमेलन आयोजित केले होते, परंतु हा गंभीर आजार दूर कऱण्यात प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर कमी पडत आहेत. जे रुग्णांना सुरुवातीला त्य...

पवारांनी मोदींना क्लीनचीट दिल्यानंतरही कॉंग्रेसने आघाडी केली तर ती राजकीय अनैतिकता-ऍड. आंबेडकर

राजकीय
सोलापुर/दि/                 शरद पवारांनी राफेल करारात मोदींना क्लीनचीट दिली आहे. पवारांचे हे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना खोटे ठरवणारे आहे. यानंतरही कॉंग्रेसने पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केली तर ही राजकीय अनैतकिता ठरणार असल्याचे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. सोलापूर येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकरांनी मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. मोदींचे हात नाही तर त्यांचे तोंड कार्पोरेट भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.                 शरद पवारांनी मोदींना क्लीनचीट देण्याच्या मुद्यावरुन ...

जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच ३ दिवसांचं ‘भागवतपुराण’!, डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हौस आणि आपले मनोरथ उघड न करता लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याची सवय यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेले ३ दिवस दिल्लीत केलेली भाषणे म्हणजे परस्पर विसंगत विधाने, संघाच्याच इतिहासाशी बेईमानी आणि लोकांच्या मनात सतत संभ्रम निर्माण करण्याच्या सवयीचं उत्तम उदाहरण आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी गांधीभवन इथं पत्रकार परिषदेत केली. वैचारिक दारिद्र्याचं प्रदर्शन                 आगामी २०१९ च्या निवडणुका जवळ येत असून आपल्या कामगिरीमुळे त्या जिंकता येणार नाहीत अशी खात्री वाटल्याने पुन्हा एकदा राम मंदिराचं भूत त्यांनी उभ...

रखवालदारी करणारा चौकीदारच निघाला चोर, राजस्थानमधील सभेत राहूल गांधीची मोदींवर सडकून टीका

राजकीय
डुंगरपुर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य करत राहुल गांधींनी गुरुवारी राजस्थानमधील सभेत नवीन घोषणा दिली. ’गली गली मै शोर है हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. राजस्थानमधील डुंगरपुर येथील सभेत त्यांनी ही घोषणा दिली. विशेष म्हणजे राहुल यांचे वडिल राजीव गांधीच्या विरोधात बोफोर्स घोटाळ्याप्रकरणी ’गली गली मै शोर है राजीव गांधी चोर है’ हीच घोषणा ८०च्या दशकात विरोधकांनी गाजवली होती.                 सभेत बोलताना राहुल यांनी निवडणूकांमध्ये स्त्रीयांनी सक्रीय  सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. भारतात जर बदल घडवायचा असेल तर स्त्रीयांचा सहभाग अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे...
राष्ट्रवादीला डिवचणार्या आंबेडकरांची विखे पाटलांनी घेतली भेट, आघाडीत येण्याचे दिले निमंत्रण

राष्ट्रवादीला डिवचणार्या आंबेडकरांची विखे पाटलांनी घेतली भेट, आघाडीत येण्याचे दिले निमंत्रण

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 राष्ट्रवादी कॉंग्रेसला डिवचणारे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी आंबेडकरांना भाजपविरोधी आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.                 विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी आंबेडकर यांची त्यांच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली. विशेष म्हणजे आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही भेट झाली आहे.                 प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या...