Tuesday, March 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्व व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान या गुन्हेगारी टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी कायदयासह एमपीडीए व तडीपारीचे शस्त्र पुणे पोलीसांकडून उगारण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णि यांनी काल खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शेडगे टोळीवर 54 वी कारवाई केली तर आज शिवाजीनगरात यल्ल्या कोळानट्टी टोळीविरूद्ध 55 वी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व पुणेकर नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुणे शहरातून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठ...
मामा आणि मामुची जमली जोडी, पर्वतीला लावली- जुगाराची गोडी,अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं

मामा आणि मामुची जमली जोडी, पर्वतीला लावली- जुगाराची गोडी,अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं

पोलीस क्राइम
पोलीस आयुक्त रितेश कुमारांची 53 वी मकोका कारवाईत पर्वती पोलीस स्टेशनने बाजी मारलीवरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडेंचे अक्षम्य दुर्लक्ष नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिवाळीत उडवण्यात येणारी शोभेच्या दारूच्या फटाकड्या तयार करण्याचे काम दक्षिण भारतात घराघरात आणि प्रत्येक गल्लीबोळात काम करणारे लोक आढळून येतात, पुण्याच्या दक्षिण भागातही घराघरात आणि गल्लीबोळात वेगवेगळ्या डाळींचे पापड लाटण्याचे काम केले जाते. पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, चतुःश्रृंगी, बिबेवाडी, वारजे माळवाडी इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत घराघरात आणि गल्लीबळात हातभट्टी निर्मिती केली जाते. तस्सं जुन्या दत्तवाडी व अत्ताच्या पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत या महाकाय झोपडपट्टीमध्ये घराघरात आणि गल्लीबोळात गुन्हेगार तयार केले जात आहेत, निर्माण होत आहेत. थोडक्यात गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना म्हणून किंवा सरावलेले गुन्हेगा...
बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून हे सात प्रश्न राहुल गांधी यांना विचारले आहेत. राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. लोकसभेत त्यांची वापसी झाली आहे त्यामुळे ते सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यात व्यस्त आहेत. तरीही 2 वेळा माजी खासदार म्हणून मला त्यांच्यासह सहयोगी पक्षांचे मूलभूत मुद्यांकडे लक्ष वळवायचे आहे' असे म्हणत त्यांनी 7 प्रश्न ट्विट केले आहेत. कोणते आहेत ते सात प्रश्न1.दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसी यांच्या खऱ्या प्रश्नांवर काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष कधी बोलणार? आणि...
भाजप-आरएसएसच्या ओबीसींबद्दल असणाऱ्या दुटप्पी धोरणावर बाळासाहेब आंबेडकरांनी ओढले ताशेरे !

भाजप-आरएसएसच्या ओबीसींबद्दल असणाऱ्या दुटप्पी धोरणावर बाळासाहेब आंबेडकरांनी ओढले ताशेरे !

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forumभाजप ओबीसींना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतेय पण, ओबीसींना मंडल कमिशनद्वारे 27 टक्के आरक्षण लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान वी.पी. सिंग यांचा जयघोष करायला ते का तयार नाहीत? हे आश्चर्यकारक आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट करत भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल केला.पुढे ते म्हणाले की, माजी पंतप्रधान वी.पी. सिंगांनी भाजपला आजार म्हटले होते म्हणून ते असं करीत आहेत का? की भाजप देशाच्या स्थैऱ्याला सर्वात मोठा धोका आहे असं म्हटलं म्हणून? की वी. पी. सिंगांच्या कार्यकाळात आडवाणी आणि त्यांच्या गुंडांना अडवून अटक करण्यात आली होती म्हणून भाजपा त्यांचा उल्लेख टाळते आहे असा रोकडा सवाल ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपला विचारला आहे. पुढे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ओबीसींना आवाहन करत असे म्हटले आहे की, “माझ्या ओबीसी बंधू आणि भगि...
पुणे महापालिकेत पैसा जिंकत आहे, मनपा कर्मचारी हारत आहेत… पुणे महापालिकेतील ॲडव्होकेट पॅनेल, सहा. विधी अधिकारी पदांच्या भरतीतही आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचा हस्तक्षेप, आयुक्तांजवळच्या उमेदवारांचा अधिक भरणा केल्याचा होत आहे आरोप

पुणे महापालिकेत पैसा जिंकत आहे, मनपा कर्मचारी हारत आहेत… पुणे महापालिकेतील ॲडव्होकेट पॅनेल, सहा. विधी अधिकारी पदांच्या भरतीतही आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचा हस्तक्षेप, आयुक्तांजवळच्या उमेदवारांचा अधिक भरणा केल्याचा होत आहे आरोप

सर्व साधारण
अभियंता भरतीमध्ये बोगस दाखले देणाऱ्यांवर अद्याप पर्यंत फौजदारी कारवाई का झाला नाही… की पैसा बोलता है…नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून नोकर भरती वेगात सुरू आहे. नोकर भरती आणि पदोन्नतीच्या बहुतांश प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांच्याकडून स्वतःहून निर्णय घेतले जात आहेत, काही प्रकरणे मुद्दामपणे शासनाच्या अभिप्रायार्थ पाठवुन 15/20 वर्ष कार्यरत सेवकांना मात्र पदोन्नती दिली जात नाहीये. महापालिकेच्या बहुतांश, सहायक मनपा आयुक्त पदावर केवळ प्रतिनियुक्तीने आलेल्या शासकीय सेवकांना संधी देण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतीमधुन आलेल्या नवख्या सेवकांना देखील सहायक महापालिका आयुक्त पदावर नियुक्त केले जात आहे. थोडक्यात पुणे महापालिकेतील संपूर्ण 80 खात्यांतील वर्ग 1 ते 4 मधील कर्मचारी त्रस्त झालेले आहेत, हैराण झालेले आहेत. आज पुणे महापालिकेत पैसा जिंक...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला दुरध्वनी तरी कारवाई होत नाही, खरे कारण आज समजलेआज 22 व 23 ऑगस्टच्या मटका जुगाराच्या चिठ्ठया सादर करीत आहे… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी संघटीत गुन्हेगारी कार्यरत आहे, तसेच वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्या गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केले जात आहे. परंतु गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करीत असतांना, मात्र त्याच गुन्हेगारी टोळ्यांनी खडकी, विश्रांतवाडी नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वतःचे आर्थिक हिताकरीता अवैध मार्गाने जुगार अड्डे सुरू केले आहेत, त्याबाबत वारंवार पोली...
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत साडेसहा लाखाची घरफोडी,गुन्हे युनिट दोन ने केले सराईत चोरांना जेरबंद

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत साडेसहा लाखाची घरफोडी,गुन्हे युनिट दोन ने केले सराईत चोरांना जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/स्वारगेट व सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीत युनिट 02 कडील अधिकारी व अंमलदार दि. 20 ऑगस्ट रोजी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना त्यांचे गुप्त बातमी दराकडून बातमी मिळाली की, घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा मीनाताई ठाकरे वसाहत येथे पांढऱ्या रंगाची आपाची गाडीसह उभा असून त्याच्याजवळ घरफोडी चोरीतिल सोनं विक्री करण्यासाठी आलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले असता, त्याच्याजवळ 107 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यार असा सर्व एकूण 6 लाख 30 हजार 750/- रु चा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याबाबत खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन गु.र.क्र.186/2023 भादवी 380, 454, 457 प्रमाण...
राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजचा घाट म्हटलं की राजकारणातील सापशिडीचा खेळ समोर येतो. कात्रजचा घाट म्हटलं की, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या दगा फटक्याची तीव्र आठवण होते. कात्रजचा घाट म्हटलं की भंबेरी कशी उडते याचे अनुभव व आठवणी डोळ्यासमोर तर्रर्रपणे उभे राहतात. परंतु त्याच कात्रजच्या घाटाचा हिस्का जर शासनातील सरकारीबाबु लावत असतील तर जाब विचारायचा तरी कुणाला. सर्पउद्यानापासून ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि तिथून पुढे कात्रजच्या बोगद्यापर्यंत आणि व्हाया मांगडेवाडी,जांभूळवाडी, नऱ्हे यासारख्या एकूण 40 ते 45 हॉटेल कम ढाबा मध्ये दिवस रात्र बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री केले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यातून राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे तसेच पुणे शहर पोलीसातील स्थान...
बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला जुगार अड्डयाची खबर, पण एकदाही कारवाई न्हाईपुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, संपूर्ण पुणे शहरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. स्वयंरोजगार सुरू करायचा तर बँका पायरीवर देखील उभे करीत नाहीत. अशा वेळी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे भाजीपाल्याची हातगाडी, कुठे चहा वडपावाची हातगाडी, कुठे नाष्ट्याची हातगाडी किंवा झालेच तर चायनिजची हातगाडी टाकुन धंदा करायचा म्हटला तरी भांडलासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. अशा वेळी भांडवल जमा करून धंदा सुरू केला तर प्रथम पुणे महापालिका आणि नंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे गैरमहसुली अंमलदार हप्ता वसुलीसाठी तत्काळ हजर असतात. आत्ता सुरू केली आहे, हप्ता कुठून देणार, मग कारवाईचे सत्र सुरू होते. ही अवस्था आज प्रत्येक काम करणाऱ्या पु...
पुण्यात ना पोलीसांची भिती, ना कायदयाचा धाक, रस्त्यावर पडतायत बिनधोक मुडदे, 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाणार काय…

पुण्यात ना पोलीसांची भिती, ना कायदयाचा धाक, रस्त्यावर पडतायत बिनधोक मुडदे, 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाणार काय…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर जबरी कारवाई सुरू आहे. सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए या कायदयाखाली प्रत्येकी अर्ध शतक गाठले आहे. यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांचा रेकॉर्ड मोडणार यात शंकाच राहिली नाही. दरम्यान जबरी कारवाई करून देखील आजही गुन्हेगारांच्या मनांत पोलीसांची भिती नाही, कायदयाचा धाक राहिला असल्याचे दिसत नाहीये. गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांची शहरात दशहत आहेच, कारवाईचा हाच वेग राहिला तर 2030 पर्यंत पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून नावलौकिक मिळवेल असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे. 18 ते 22 वर्षापर्यंतची मुले गुन्हेगार का होत आहेत यावर विचार मंथन होण्याऐवजी केवळ कारवाईच धडाका सुरू असल्याचे दिसत आहे. मंगला टॉकिजसमोर तरुणाचा खुन करणाऱ्या 17 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक-पुणे शहर पोलीस आय...