Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

भूखंड घोटाळे, सरकारी टेंडर, मॉल, कॉलसेंटर सारख्यांतून कोट्यवधी रुपये लुबाडणारेच आंबेडकरांना विरोध करीत आहेत

balasaheb ambedkar nf

५२ टक्के ओबीसी, २२.५ टक्के एससी/एसटी, ६ टक्के व्हीजेएनटी
एकुण ७ कोटी जनसमुदांच्या विरूद्ध तलवारी काढुन,
त्यांचे आरक्षण रद्द करण्याची भाषा वापरून,
दोन्ही भाजपा खासदारांना नेमक काय सिद्ध करायचं आहे?

…मग बाळासाहेब आंबेडकर बोलले त्यात चूकीचे काय आहे ?

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षण प्रश्‍नांवर आपली सडेतोड भूमिका मांडल्यामुळे, राज्यातील २०० च्या आसपास असलेल्या मराठा जहॉगिरदारांचे पितळ उघडे पडले आहे. हे दुसरे तिसरे कुणीच नसून, राज्यातील भूंखड माफिया आहेत. मोकळ्या व पडीक जमिनीचा शोध घेणे, तिर्‍हाईताची जमिन स्वतःच्या नावावर करून ती गिळंकृत करणारे, कोट्यवधी रुपये खर्च करून कॉल सेंटर आणि मॉल संस्कृती निर्माण करणारे, पब आणि डान्सबारच्या माध्यमातून बहुजन समाजाला नाडणारे, सरकारी टेंडरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारे आज कोट्यधीश, अब्जाधीश झाले आहेत. ह्याच मंडळींचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. बाळासाहेब आंबेडकर मराठा आरक्षण प्रश्‍नांवर थेट भूमिका मांडल्यानंतर, त्यांना विरोध करणारे केवळ हीच मंडळी असून मराठा समाजाने अशा कूप्रवृत्तींना दूर करून, आरक्षणाचे आंदोलन नेटाने पुढे नेण्याचे आवाहन राज्यरशासनाच्या सेवेतील व विधी क्षेत्रात कर्तव्य बजाविलेल्या माजी अधिकार्‍यांनी मत व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर असे काय म्हणाले की, दोन्ही राजा आणि त्यांच्या चिट्टया पिट्टयांना राग यावा... बाळासाहेब आंबेडकरांनी उलट समाजाला जागे करण्याचे काम केले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखात सर्व वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली आहे, परंतु मिडीयावाल्यांना जे पाहिजे तेवढेच त्यांनी दाखविले आहे. बाळासाहेब त्यांच्या मुलाखतीत म्हणाले की, आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचेेही रद्द करा असे म्हणणे चुकीचे आहे. ही मागणी करणारा राजा बिनडोक आहे. राज्य घटना कळत  नसतांना त्यांना भाजपाने राज्यसभेवर का पाठविले आहे असे ते म्हणाले. यात काहीच चूक नसून भारतीय संविधानाने देशातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण दिले आहे. ओबीसींना देखील याच माध्यमातून आरक्षण दिले आहे. एसटी,  एससीचे आरक्षण हटविणे कोणलाच शक्य नाही. यामुळेच एस.टी., एस.सी. च्या आरक्षणाच्या सरकारी खात्यातील जागा भरत नाहीत. जागा रिक्त ठेवून, आरक्षण नाकारले जात आहे. परंतु ओबीसींना जे आरक्षण मिळाले आहे, त्यांना ते का मिळाले, आम्हाला नाही मिळाले तर त्यांनाही मिळू देणार नाही ही भूमिका योग्य नाही. आरक्षणाचे तत्व भारतीय संविधानाने निश्‍चित  केले आहे. ते कुणाच्या सांगण्यामुळे वा बोलण्यामुळे रद्द होण्याचा प्रश्‍नच नाही. मग ही बेताल विधाने करून मराठा समाजाची दिशाभूल का केली जात आहे. 

दूसरे कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी देखील तुळजापूर येथे म्हणाले की, सरकार मग ते राज्यातील असो की केंद्रातील. त्यांनी मराठा समाजाच्या भावना समजुन घ्याव्यात. आम्ही भीक नाही, हक्क मागतोय. कायदा हातात घ्यायचा नाही. पण तशी वेळ आणू नका. आमच्याकडे साध्यासुध्या तलवारी नाहीत असा इशारा भाजपाचे खासदाराने दिल्या आहेत. 

दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी याच मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, दोन्ही राजांचा बंदला पाठींबा असल्याचे कुठेही वाटले नाही. एक राजा बिनडोक आहे तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका चांगली घेतली हे बरोबर आहे, पण ते आरक्षण सोडून इतर मुद्यांवरच जास्त भर देत आहेत असे त्यांनी नमूद केले होते.
 
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी देखीज युवराज संभाजी राजे यांच्यावर सडकुन टिका केली आहे, ते म्हणाले की, राज्यसभेत २०१८ मध्ये मंजूर झालेल्या १०२ व्या घटना दुरूस्तीमुळे मागासवर्ग आयोगाने कायदयाने आरक्षणासाठी नवे प्रवर्ग तयार करण्याचे राज्यांचे अधिकार रद्दबातल ठरले. या घटना दुरूस्तीला भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांसमोर जाऊन आर्थिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी) मराठा आरक्षणाची मागणी करण्याचा दुटप्पीपणा करतात. संसदेत एक बोलतात आणि समाजासमोर त्याच्या विरोधी भूमिका म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

प्रवीण गायकवाड यांनी मराठा समाजासहित बहुजन समाजातील नवयुवकांना सुमारे ६० ते ७० राष्ट्रांत व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. ते युवकांना उद्योग व्यवसायाला लावत आहेत. त्यांचे काम मोठे आहे. त्यांचा अव्हेर करणे शक्यच नाही. 
दरम्यान पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुण्यात मराठा आरक्षण प्रकरणी दिलेल्या मुलाखतीकडे आपला मोर्चा वळविला, ते म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले आहे की, मराठा समाजाचे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. नेते आहेत. महाराष्ट्र घडविलेले राज्यकर्तेही आहेत. नेतृवाचा विषय हा त्यांचा आहे. आरक्षणाचा मुद्दा विचलित करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. ज्यांना घटना माहित नाही, त्यांनी बोलू नये. आरक्षण घटनेने दिले आहे. ज्यांना आरक्षण मिळाले त्यांच्याशी अर्थात ओबीसींशी उघड भांडण करायचे आहे काय... मराठा समाजाचे निघाले तसे ओबीसी समाजाचेही मोर्चे निघाले होते. तेंव्हा शांतता राखण्याचे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनीच केले, अन्यथा महाराष्ट्रात यादवी निर्माण झाली असती ह्या त्यांच्या  विधानावर सर्वांनी संमती दिली होती. 

दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी नमूद केले आहे की शांत वातावरणाला पेटवण्याचे काम कुणी करू नये, स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जात असल्याचेही नमूद केले आहे. दरम्यान वातावरण पेटविण्याचे काम कोण करीत आहे हे मराठा समाजाने समजुन घेण्याचे आवाहन देखील राज्य सरकार व विधी विभागात काम केलेल्या माजी अधिकार्‍यांनी असोसिएशनच्या वतीने मत व्यक्त केले आहे.